राजपूत भामटा बोगस प्रमाणपत्राची घुसखोरी

    दिनांक :19-Jun-2023
Total Views |
वाशीम,
Rajput Bhamta विमुक्त जातीच्या प्रवर्गातील राजपूत भामटा या मुळ जातीचे बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागास जातीतील लोकांनी सामाजिक आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष विविध शासकीय नोकर्‍या व शैक्षणिक जागेवर अतिक्रमण करुन संपूर्ण विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय सुरु केला आहे. ही घुसखोरी थांबविण्याच्या मागणीसाठी गोरबंजारा समाजातील अग्रगण्य संघटना असलेल्या गोरसेनेच्या जिल्हा शाखेने आज, १९ जून रोजी दुपारी १२.३० वाजता स्थानिक मुख्य मार्गावरील वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात केले. यावेळी गोरसेनेचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. विमुक्त जातीच्या संवर्गात राजपूत भामटा ही एक जमात असून बिगर मागास राजपूत जातीतील लोक भामटा हे शब्द जातीपुढे लावून राजपूत भामटाचे शैक्षणिक व नोकर्‍यांमध्ये नुकसान करत आहे.
 
 
dfr667
यासंदर्भात गोरसेनेनी २२ जुलै १९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील ३०० ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले होते. त्यानंतर ११ मे २२ रोजी याच मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चाही काढला होता. तरीही राजपूत भामटा या जातीच्या नावाने बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागास जातीतील लोकांनी शासकीय नोकर्‍या व शैक्षणिक ठिकाणी घुसखोरी सुरुच ठेवली आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी गोरसेनेचे हे Rajput Bhamta आंदोलन आज संपूर्ण राज्यात पार पडले. दरवर्षी राजपूत भामटाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन हजारो जागा एमबीबीएस, एमडी, बीएएमएस, इंजिनिअरींगमध्ये बिगर मागासांनी लुटल्या आहेत. असे असताना शिंदे फडणवीस सरकारने भामटा हा शब्दच काढण्यासाठी हालचाली सुरु केल्याने भविष्यात राजपूत भामटा व विमुक्त जातीचे आरक्षण पूर्णतः धोक्यात येणार आहे.
म्हणून शासनाने सदर शब्द कोणत्याही परिस्थितीत हटवू नये, बिगर मागास नामसाधर्म्य असलेल्या जातींनी गैरफायदा घेऊ नये, यासाठीं बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी, असे बोगस प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, राजपूत भामटाचे बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावे, Rajput Bhamta जातवैधता पडताळणी समितीवर विमुक्त जातीचे प्रतिनिधी घ्यावे, १९३१ च्या जनगणने प्रमाणे व १९६१ च्या थाडे कमिशनच्या शिफारशीनुसार ज्या गावात व्हीजेअ प्रवर्गातील मूळ राजपूत भामटा वास्तव्याला होते त्या गावाच्या नावाची जातनिहाय यादी दरवर्षी प्रदर्शित करण्यात यावी, राजपूत भामटा मधील भामटा शब्द वगळू नये आदी मागण्यासाठी गोरसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील हजारो गोरसैनिक रस्त्यावर उतरले होते. भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रमुख आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.