कोल्हापूर,
Shanta Tambe : मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे (Shanta Tambe) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शांता तांबे यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी मराठी नाटकांमधून अर्थात् रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी अनेक नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या होत्या. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी सगळ्यांच्याच मनावर खोलवर छाप सोडली होती.
केवळ रंगभूमीच नव्हे, तर मराठी चित्रपटातून देखील त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. मोहित्याची मंजुळा, मर्दानी, सवाल माझा ऐका, बाई मोठी भाग्याची, मोलकरीण, आई पाहिजे, दोन बायका फजिती ऐका अशा चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्याकाळी त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने अशा नावाजलेल्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत काम केले होते. घरची परस्थिती बेताची असल्याने त्यांनी आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून मनोरंजन विश्वात काम करण्याचा निर्णय घेतला होता. (Shanta Tambe) बहुढंगी भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती.