नवी दिल्ली,
शेतकरी आणि पशुपालकांच्या मिळकतीत वाढ व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या कॉमन सर्विसेस सेंटर अर्थात सीएससी आणि Patanjali-CSC Agreement पतंजली ग्रामोद्योग (न्यास) यांच्यात एक महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सीएससीचे व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार राकेश आणि न्यासाचे महामंत्री डॉ. यशदेव शास्त्री यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
Patanjali-CSC Agreement सीएससीच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. शास्त्री म्हणाले की, सीएससीच्या संपूर्ण देशातील सहा लाखांहून अधिक ग्रामीण उद्यमींना पतंजलीचे युरियामुक्त, शुद्ध सात्विक उत्पादन दिले जातील, ज्याद्वारे पशूंच्या उत्पादन क्षमतेत वृद्धी होईल. अतिशय वाजवी दरात पतंजली संतुलित पशु आहार उत्पादन, आयुर्वेदिक पशु औषधी देशातील शेतकर्यांना मिळून शकतील. यामुळे पशुपालकांची मिळकत वाढेल आणि ग्रामीण आर्थिक उन्नतीसोबतच देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचा संकल्पही पूर्णत्वास जाईल.