तेजोमय सोहळा!

Shivrajyabhishek Sohola महाराजांच्या नावाने राजकारण

    दिनांक :02-Jun-2023
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
Shivrajyabhishek Sohola निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, महाराष्ट्राचा पराक्रम, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राची दुर्दम्य आकांक्षा, महाराष्ट्राच्या शौर्याचे तेजस्वी प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. Shivrajyabhishek Sohola त्यांनी बलाढ्य मोगल सत्तेला धूळ चारत अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करीत स्वराज्याची स्थापना केली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर सा-या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती, हा एक सुवर्णक्षण ठरला. Shivrajyabhishek Sohola हाच सुवर्णक्षण पुन्हा एकदा ३५० वर्षांनंतर महाराष्ट्रातील जनतेने अनुभवला. त्याकाळी ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर बसविण्यात आलेल्या महाराजांना आज कोट्यवधी जनतेने आपल्या मनात बसवून एक देदीप्यमान शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. अर्थात याला माध्यम ठरले ते राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार! Shivrajyabhishek Sohola
 

shivaji maharaj 
 
Shivrajyabhishek Sohola मुनगंटीवारांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या ३५० वर्षांपूर्वीच्या त्या तेजोमय सोहळ्याची अनुभूती पुन्हा एकदा स्वतंत्र महाराष्ट्रातील जनतेने घेतली. तब्बल ३५० वर्षांनंतर रायगडावर गडदेवता म्हणजे शिर्काई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. राज्याभिषेकासाठी ज्या चांदीच्या पालखीचा वापर केला गेला, त्या पालखीचंही पूजन यावेळी करण्यात आले. जगदीश्वराचे मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीनं पूजन करण्यात आले. Shivrajyabhishek Sohola ऐतिहासिक नंदीच्या दगडी मूर्तीवर तब्बल साडेतीनशे वर्षांनंतर पितळेचा मुखवटा बसवला गेला. ज्या गागा भट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक केला होता, त्या गागा भट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराजांना या विधीसाठी पाचारण करण्यात येऊन त्यांच्या हस्ते हा सोहळा विधिवत पार पडला. Shivrajyabhishek Sohola अशा या खास आणि तितक्याच अभिमानास्पद दिवसाचे साक्षीदार होण्याचे अनेकांना भाग्य लाभले. ते सगळे कृत्यकृत झाले, नतमस्तक झाले. मात्र, काही अल्पसंतुष्ट लोक या दिमाखदार सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात गुंतलेले दिसत आहेत. संपूर्ण सोहळ्यात सोबत राहून सगळ्या प्रक्रियेत सहभागी होऊन, सर्व संपल्यावर जाताना आपण नाराज असल्याचे खासदार सुनील तटकरे माध्यमांना सांगून तेथून निघाले. Shivrajyabhishek Sohola
 
 
अमोल मिटकरींनी ट्विटवर टिव-टिव केली. जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेंनी आपल्या अकलेचे तारे तोडले. संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे वल्गना केल्या... राज्यात एखादी चांगली गोष्ट होत असेल, तर त्यांची प्रशंसा नाही केली तरी चालेल; पण खोडा घातलाच पाहिजे अशातला भाग नाही. यांची मानसिकताच संकुचित आहे. Shivrajyabhishek Sohola यावेळी एक गोष्ट स्पष्ट झाली की, शिवाजी महाराजांच्या नावाने आपली राजकीय पोळी शेकणारे उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री असते तर शंभर टक्के एवढा दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा नक्कीच आयोजित झाला नसता. आता अडीच वर्षे मुख्यमंत्री राहून महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी काहीही न करणाèया लोकांकडून एवढ्या मोठ्या सोहळ्याची अपेक्षा करणेच मुळात मूर्खपणाचे ठरेल. साधं महाराजांसाठी पक्ष, राजकारण बाजूला ठेवून सोहळ्याची प्रशंसासुद्धा हे लोक करू शकले नाहीत. नाही त्या विषयात क्षणाचाही विलंब न करता आपली प्रतिक्रिया देणारे यावेळी खुराड्यातून बाहेर आले नाही. Shivrajyabhishek Sohola किमान महाराजांच्या जयंतीप्रमाणे यावेळी शिवराज्याभिषेकाच्या तिथीचा घोळ तर नव्हता.. मग त्यासाठी तरी उद्धव ठाकरे बाहेर पडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यातही ठाकरेंनी निराशच केले. एवढ्या कोत्या मनाची ही लोकं. श्रीमंत मनाच्या महाराजांचे नावसुद्धा घेण्याच्या लायकीची नाहीत.
 
 
Shivrajyabhishek Sohola तरीदेखील महाराजांच्या नावाने राजकारण करून मतांची भीक मागताना यांना लाज वाटत नाही, याचे आश्चर्य वाटते. सोहळा शासकीय होता. त्यातही तो महाराजांचा सन्मान होता. या अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार व्हायचे सोडून, सहभागी होऊन महाराजांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी नावं-बोटं ठेवून महाराजांचा अवमान आपण करीत आहोत, याचे साधे भान या लोकांना राहिले नाही. ४०० वर्षांच्या गुलामगिरींच्या श्रुंखलेला महाराजांनी केवळ एका राज्याभिषेकाने मूठमाती दिली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील अशा तुच्छ मनोवृत्तींना या ३५० वर्षांनंतरच्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने पुन्हा एकदा मूठमाती दिली जाईल, एवढे मात्र निश्चित आहे. Shivrajyabhishek Sohola शिंदे - फडणवीस सरकारने महाराजांचा पुन्हा एकदा भव्य-दिव्य राज्याभिषेक करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. प्राधिकरणाची स्थापना केली, कोट्यवधींचा निधी जाहीर केला, शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वराज्यात, सुराज्य आणण्याची ग्वाहीदेखील दिली. Shivrajyabhishek Sohola त्यामुळे आता ख-या अर्थाने महाराजांच्या स्वराज्यात, शिवरायांच्या समृद्ध राज्यात राहण्याचा अनुभव महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला होईल असा राज्य कारभार सत्ताधा-यांनी करावा, अशी माफक अपेक्षा आहे.
 
९२७०३३३८८६