बोलक्या 350 स्मार्ट डस्टबीन सेवेत

- सांगणार कचरा सांडते लवकर उचला
- स्मार्ट बिनवर लावले सेन्सर

    दिनांक :02-Jun-2023
Total Views |
नागपूर,
Smart Dustbin : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. तर्फे शहरात विविध 175 हून अधिक ठिकाणी जवळपास 350 पेक्षा अधिक स्मार्ट बिन लावण्यात आले आहेत. या अत्याधुनिक बिनची क्षमता 1100 लिटरची आहे. या स्मार्ट डस्टबीन चोरी जाऊ नये म्हणून सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवली जात आहे. विशेष म्हणजे या स्मार्ट डस्टबिनवर सेन्सर लावण्यात आले असून, डस्टबिन 80 टक्के भरल्यास स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षाला लगेच मॅसेज मिळेल.
 
Smart Dustbin
 
स्मार्ट डस्टबिन (Smart Dustbin) बनवण्याचे टेंडर मुंबईच्या बायोक्रक्स या कंपनीला मिळाले आहे. विशेष म्हणजे हे डस्टबिन जर्मनी येथून बनून आलेल्या आहेत. या स्मार्ट डस्टबिनची टेक्नोलॉजी जर्मनीने विकसित केलेली आहे. जिओ कंपनी या डस्टबिनसाठी सिम कार्ड उपलब्ध करून देत आहे. डस्टबिन चोरी होऊ नये म्हणून डस्टबिनमध्ये सेंसर बसवण्यात येणार आहेत.डस्टबीनमध्ये सेन्सर बसविण्यात येणार असून, त्यामुळे डस्टबीनची चोरी होणार नाही. 70 ते 80 टक्के डस्टबिन कचर्‍याने भरले की, महापालिकेच्या स्वच्छता विभागाला त्याची माहिती सेन्सरद्वारे तत्काळ मिळणार आहे.
 
 
माहिती मिळताच कचरा गोळा करणारे कर्मचारी डस्टबिनमधील (Smart Dustbin) कचरा उचलण्यासाठी पोहोचतील. त्यामुळे डस्टबिनच्या आसपास कचरा साचणार नाही. स्वच्छतेच्या क्रमवारीत नागपूरचा दर्जा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मनपाच्या बहुतांश डस्टबिन चोरीला गेल्या. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने शहरभर 1200 हून अधिक डस्टबिन बसवले होते. यापैकी 600 हून अधिक डस्टबीन चोरीला गेल्या आहेत किंवा झीज होण्याच्या नादात बळी पडले असून, बसवलेल्या डस्टबीनमधून कचरा उचलण्याच्या बाबतीतही आरोग्य विभाग हलगर्जीपणा दाखवत आहे.
 
 
डस्टबिनच्या (Smart Dustbin) आजूबाजूच्या रस्त्यांवर साचलेल्या कचर्‍याचा स्वच्छतेच्या मानांकनावर परिणाम झाला आणि नागपूर मागे पडले. व्यवस्था सुधारण्यासाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने स्मार्ट डस्टबिन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. जर कचर्‍यात आग लागली तर लगेच महापालिकेच्या स्वच्छता विभागाला माहिती मिळणार. कारण स्मार्ट डस्टबिनमध्ये फायर सेंसर सुद्धा लावण्यात आले आहे. हे स्मार्ट डस्टबिन 70 टक्के बंद तर 30 टक्के खुले आहे. विशेष म्हणजे पाऊसामुळे डस्टबिन खराब होऊ नये किंवा इतर व्यक्तिकडून डस्टबिन खराब करू नये म्हणून डस्टबिन पूर्णपणे खुले बनवले गेले नाही. या स्मार्ट डस्टबिनची क्षमता 1100 लीटरची आहे. डस्टबिन कचर्‍याने भरले की लगेच सेंसर द्वारे याचा मॅसेज महापालिकेच्या स्वच्छता विभागाला येणार आणि हे सर्व संगणकाद्वारे ऑपरेट केले जाणार आहे.