भारतातील पहली रणरागिणी ट्रकचालक योगीता रघुवंशी

02 Jun 2023 10:55:40
चंद्रकांत लोहाणा
वाशीम,
Yogita Raghuvanshi पतीच्या अपघाती मृत्यूनंतर योगीता रघुवंशी ह्या गेली २० वर्षापासून ट्रक चालक म्हणून काम करत असून, भारताची ही पहिली महिला ट्रक चालक सद्या १४ चाकाचा अजस्त्र ट्रक चालवत आहेत. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ट्रकचालक योगीता ह्या नुकत्याच वाशीम जिल्ह्यातून शेलुबाजार मार्गे अमरावतीकडे पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या. योगीता ह्या महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील रहिवासी असून, योगीता ह्यांनी वकीली व कॉमर्स शिक्षण पुर्ण केले. योगीता यांचा विवाह भोपाळ येथील राजबहादूर रघुवंशी यांच्याशी झाला. लग्नानंतर भोपाळ येथे गेल्यानंतर पतीचा ट्रक चा व्यवसाय असल्याचे त्यांना समजले. लग्नानंतर सर्वकाही सुरळीत असतांना काळाने आघात केला आणि योगीता यांच्या पतीचा ट्रक अपघातात दुदैवी मृत्यू झाला.
 
 
washim
 
दरम्यान पतीच्या अंतीम संस्कारासाठी येतांना भावाचा अपघातात मृत्यू झाला. पतीचा आणि भावाचा अपघातील मृत्यू झाला. पदरी दोन अपत्ये. या दुःखातून सावरत त्यांनी एका जेष्ठ वकिलाकडे असिस्टंट म्हणून काम केले. Yogita Raghuvanshi परंतु, त्यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणे अवघड झाले. या संकटातून त्यांनी स्वतःला धीर देत ट्रक चालविण्याचा निर्धार केला आणि ट्रक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. योगीताचा प्रवास हा संघर्ष पुर्ण आहे. आज रोजी योगीता यांनी ट्रक चालवून आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षीत केले. देशभरातील कानाकोपर्‍यात ट्रक चालवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. या दरम्यान त्यांनी अनेक संकटाशी सामना केला.
Powered By Sangraha 9.0