नक्षलवाद्यांकडून आदिवासींची दिशाभूल !

naxals burn tendupatta नक्षल्यांची आर्थिक कोंडी

    दिनांक :02-Jun-2023
Total Views |
वेध
 
- विजय कुळकर्णी
naxals burn tendupatta आदिवासींच्या विकास व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून नक्षलवादी चळवळ सुरू झाली होती. मात्र, आता हा मुद्दा बाजूला पडल्याचे दिसत आहे. या चळवळीच्या माध्यमातून पैसा कसा गोळा होईल, एवढाच उद्देश पूर्ण करण्यासाठी ही चळवळ सुरू असून नक्षलवादी आदिवासींची दिशाभूल करीत असल्याचे काही घटनांवरून निदर्शनास येत आहे. ३१ मे च्या रात्री नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरील धानोरा तालुक्यातील तीन गावातील तेंदूपानांच्या तीन फळी जाळल्या. त्यामुळे कंत्राटदार व मजुरांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. naxals burn tendupatta दहशत पसरविणे हाच उद्देश या कृत्यामागे होता आणि त्यात नक्षलवादी काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात अशाप्रकारे जाळपोळ, गोळीबार करायचा आणि आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यात पळून जाऊन लपून बसायचे. हे गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवादी करीत आहेत. naxals burn tendupatta अशा कारवायांमुळे दहशत निर्माण करण्यात जरी ते यशस्वी झाले असले, तरी ज्या आदिवासींसाठी त्यांनी ही चळवळ सुरू केली आहे, त्यांनाच आर्थिक संकटाच्या खाईत ढकलण्याचे काम ते करीत आहेत.
 

tendupatta 
 
naxals burn tendupatta तेंदूपानांचे दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी ही जाळपोळ केल्याचे नक्षल्यांनी म्हटल्याचे घटनास्थळावर आढळलेल्या पत्रकात नमूद असल्याचे समोर आले आहे. तेंदूपानांना ११०० रु. प्रतिगोणी दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवा. कंत्राटदारांना पळवून लावा, असे त्या पत्रकात म्हटल्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले. हे सांगतानाच हे कृत्य नक्षल्यांचे की समर्थकांचे, याचा तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले. naxals burn tendupatta त्यावरून या घटनेमागे नक्षलवादीच असतील हे नक्की सांगता येत नाही, असे म्हणण्यास त्यांनी जागा ठेवली आहे. या कृत्यामागे कोणी जरी असले, तरीही नुकसान आदिवासी मजुरांचेच होणार आहे. कारण अशा कृत्यामुळे जर कंत्राटदारांना आपल्या माल व जीविताच्या संरक्षणाची हमी वाटली नाही, तर ते आपला व्यवसाय गुंडाळतील. त्यानंतर होणारे परिणाम अधिक गंभीर असतील. कारण तेंदूपानांच्या विक्रीवरच गडचिरोली आणि परिसरातील आदिवासी मजुरांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. naxals burn tendupatta त्यामुळे मजुरांसमोर आर्थिक प्रश्न उद्भवू शकतो.
 
 
मागच्या वर्षी कमी भाव मिळाल्याने मजुरीवर त्याचा परिणाम झाला. naxals burn tendupatta तर, कंत्राटदारांनी काही ठिकाणी ग्रामसभांच्या माध्यमातून तेंदूपाने संकलन करण्यास सांगितले. यामुळे नक्षल्यांची आर्थिक कोंडी झाली. यातून नक्षल्यांना खंडणी मिळते, अशी माहिती आहे. यावर्षी ग्रामसभांना तेंदूपाने संकलन करायला सांगितल्यामुळे नक्षल्यांची आर्थिक कोंडी झाली आणि हेच या घटनेमागील खरे कारण असल्याचे सांगितले जात आहे. naxals burn tendupatta यापूर्वीदेखील आदिवासींच्या विकासाच्या नावाखाली नक्षलवादी परिसरातील रस्ते, पूल होऊ न देण्यासाठी नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणले होते. लष्करी अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून या परिसरातील रस्ते करण्यात आले होते. आदिवासींचे नाव पुढे करायचे आणि त्यांच्यापर्यंत शासनाच्या योेजना पोहोचू द्यायच्या नाहीत. त्यामुळे ज्या उद्देशाने ही चळवळ सुरू झाली होती. naxals burn tendupatta त्याच्या विपरीत ही चळवळ सध्या सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
 
 
कालच्या घटनेतील विशेष बाब म्हणजे घटनास्थळावर आढळलेल्या पत्रकात शेवटी ‘उत्तर गडचिरोली डिव्हिजन कमिटी भाकपा (माओवादी)' असे नमूद केले आहे. naxals burn tendupatta यावरून या कृत्यामागे कोणाचे डोके असावे हे सांगण्याची गरज नाही. त्या डोक्यातील विचारांना उजवी विचारसरणी मान्य नाही. मात्र, एक गोष्ट येथे सांगाविशी वाटते; ती म्हणजे जेथे या विचारांचा जन्म झाला. आज तेथूनच त्या विचारांना मूठमाती मिळाली आहे. पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ असलेली त्यांची सत्ता गेली आहे. त्रिपुरा हे राज्यदेखील आता त्यांच्या ताब्यात राहिले नाही. naxals burn tendupatta याचा विचार त्यांनी केला पाहिजे. तेव्हा नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे. आदिवासींना त्यांचा विकास साधण्यासाठी शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात सहकार्य केले पाहिजे. तरच, त्यांच्या चळवळीला ख-या अर्थाने यश मिळेल. अन्यथा आदिवासी आर्थिक गर्तेत आणखी खोलवर ढकलला जाईल, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
८८०६००६१४९