तभा वृत्तसेवा
भंडारा,
Electricity unit rates : महाराष्ट्र राज्यात व विदर्भात मोठया प्रमाणात वीज निर्मिती होत असून येथून इतर राज्यांना वीज पुरवठा केला जातो. परंतु विद्युत निर्मिती करणाèया भागातील नागरिकांनाच वीजेच्या भरमसाठी बिलाचा फटका सहन करावा लागत आहे. इतर अनेक राज्यांपेक्षा येथील घरगुती विद्युत बिलाकरिता युनिटचे दर अधिक असल्याने ते कमी करण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पाठविले आहे.
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना शंभर युनिटच्या आत 4 रुपये तर शंभर युनिटच्या नंतर तब्बल 9 रुपये एवढा दर आकारण्यात येतो. यानंतरही अतिरिक्त भार म्हणून अनेक कर लावण्यात येतात. यामुळे भरमसाठी येणाèया घरगुती वीज देयकांमुळे गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. शेतकरी, कष्टकरी मजूर वर्ग दररोज कमावून हातावर आणून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. अशात भरमसाठ रक्कमेच्या येणा-या घरगुती विद्युत बिलामुळे वीज वापर डोईजड होत आहे. (Electricity unit rates)
घरगुती वापराकरिता विद्युत विभागाने आकारलेले दर व कर हे कमी व्हावे व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा अशी मागणी काँग्रेसतर्फे महेंद्र वाहाणे यांनी केली आहे. घरगुती वापराकरिता विद्युत दर कमी केले नाही तर कांग्रेस पक्षातर्फे याविरोधात आंदोलन केल्याशिवाय राहाणार नाही असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला. निवेदन देतांना महेंद्र वाहाणे यांच्यासह कांग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, इंटकचे जिल्हा उपाध्यक्ष जिवन भजनकर, जिल्हा महासचिव सोहेल अहमद, अनिक जमा पटेल, माजी नगर सेवक पृथ्वीराज तांडेकर, किशोर राऊत, मेहमुद खान, राजविलास बोरकर, सोनू कोटवाणी, रवींद्र थानथराटे, शेख नवाब, सुनिल नागपुरे, भावेश नागपुरे आदी कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Electricity unit rates)