तिरोडा,
SGSP scheme पगारदार कर्मचारी यांच्यासाठी असलेली एसजीएसपी योजना स्थानिक कॅनरा बँकेच्या शाखेत सुरू करण्यात आली आहे. येथील कॅनरा बँक शाखेत एसजीएसपी योजना सुरू करण्यात यावी ह्या संदर्भात प्राथमिक शिक्षक संघ शाखा तिरोडा तर्फे वरिष्ठांना अनेक निवेदने देण्यात आली होती. त्या अनुषंगाने येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एम.डी. पारधी, तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक यांच्या सहकार्याने सर्व शिक्षकांचे बँक अकाउंट डिटेल्स कॅनरा बँक शाखेत सादर करण्यात आले. मात्र 16 शिक्षकांचे बँक खात्यात त्रुटया असल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली होती.
या 16 शिक्षकांचे पुन्हा नविन खाते SGSP scheme उघडण्यात आले. 19 जून रोजी प्राथमिक शिक्षक संघ शाखा तिरोडाच्या पदाधिकाऱ्यांनी बँक व्यवस्थापक जीवन गाडगे यांची भेट घेत एसजीएसपी योजने संदर्भात चर्चा केली. गाडगे यांनी कॅनरा बँक पे रोल योजनेत सर्व शिक्षकांचे वेतन खाते रूपांतरित करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान त्यांनी रूपांतरित झालेले खाते कसे पहायचे, अकाउंट गोल्ड, डायमंड, प्लॅटीनम यापैकी कोणते पॅकेज आहे. हे कुठे पाहायचे या संदर्भात माहिती दिली. पे रोल एसजीएसपी योजनेअंतर्गत बँक खाते निर्माण होणे ही शिक्षकांसाठी एक जमेचीच बाजू असून आनंदाची पर्वणी आहे. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे सर्व खाते कॅनरा बँक पे रोल योजनेअंतर्गत तयार झालेले आहेत. पहिला ट्रांजेक्शन होताच एसजीएसपी योजनेअंतर्गत असलेले लाभ सर्व शिक्षकांना मिळणार असल्याचे गाडगे यांनी सांगितले. प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे जीवन गाडगे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उपस्थिती. यू. पी. पारधी, अरविंद उके, राजू गुन्नेवार, जे. डी. अंबुले, नरेंद्र आगाशे, एच. एम. रहांगडाले, शीतलकुमार कनपटे, के. एस. रहांगडाले, टी. बी. भगत, दिलीप हिरापुरे, यू. पी. बिसेन, भावेश तितीरमारे, रविकिरण ढोरे, गुलाब ठाकरे आदींसह अन्य शिक्षक उपस्थित होते.