संत तुकाराम महाराज व संत निळोबाराय गुरु-शिष्य भेटीचा क्षण

Sant NilobaRay संत निळोबा हे अहमदनगर च्या पिंपळनेरचे

    दिनांक :24-Jun-2023
Total Views |
वारी पंढरीची 

झाली भाग्याची उजरी । दृष्टी देखताची पंढरी ।। Sant NilobaRay
ठेविले तो कर कटी । जेणे अवलोकिला दिठी ।।
चंद्रभागे केले स्नान । भक्तां पुंडलिकाचे दर्शन ।।
निळा म्हणे वैकुंठवासी । प्राणी होईल निश्चयेसी ।।
Sant NilobaRay जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे पुत्र तपोनिधी श्री नारायण महाराज यांच्या समकालीन असणारे संत श्री निळोबाराय. संत निळोबा हे अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेरचे. त्यांची चरित्र विषयक माहिती फार अल्प प्रमाणात उपलब्ध होते. संत चरित्रकार महीचती यांनी निळोबांविषयी भद्यविजयाच्या ५९ व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिकाही सांगितल्या आहेत. Sant NilobaRay त्यांचा काळ सतराव्या शतकाचा पूर्वार्ध असावा. ते शके १५८० (इ.स. १६५८) च्या सुमारास विद्यमान होते अशी माहिती महाराष्ट्र भाषा भूषण ज.र.आजगावकर यांनी दिली आहे. संत तुकाराम महाराजांचे परमशिष्य असणारे श्री निळोबाराय यांनी श्री नारायण महाराज यांच्या बरोबर १७०९ पासून आषाढी वारी सुरू केली. याशिवाय त्यांची माघ वारी सुरू होतीच. फाल्गुन व. तृ. इ .स. १७५३ ला पिंपळनेर (ता. पारनेर , जिल्हा अहमदनगर ) येथे संत श्री निळोबाराय समाधिस्थ झाले.
 
 

Sant Nilobaray 
 
 
संत श्री निळोबाराय Sant NilobaRay यांच्या पश्चात त्यांच्या वंशजानी माघवारी सुरू ठेवली परंतु आषाढी वारी खंडित झाली. इ. स. १७५३ साली समाजसेवक अण्णा हजारे व रामदास बुवा मनसुख यांनी संत निळोबाराय सेवा मंडळाची स्थापना केली व निळोबाराय ट्रस्ट व सेवा मंडळ मिळून स्वतः पायी चालत आषाढी दिंडी सुरू केली. इ. स. २०१४ पासून या दिंडीला पालखी सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. श्री क्षेत्र पिंपळनेर ते श्री क्षेत्र पंढरपूर Sant NilobaRay संत श्री निळोबाराय पालखी सोहळ्यात ऐतिहासिक क्षण म्हणजे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज व श्री संत निळोबाराय गुरू-शिष्य भेट. कैवल्याचा पुतळा.. प्रगटला भूतला.. हात ठेवीला मस्तकी.. प्रसाद देऊनी केले सुखी याप्रमाणे संत तुकाराम महाराज यांचे शिष्य संत निळोबाराय या दोन्ही संतांच्या पालख्यांची ही अविस्मरणीय भेट या वर्षीच्या पालखी सोहळ्यात २२ जून रोजी इंदापूर (जिल्हा पुणे) येथे झाली.
 
 
Sant NilobaRay संत श्री निळोबाराय पालखी सोहळा प्रमुख व वंशज गोपाळकाका मकाशिर व संस्थानचे कार्याध्यक्ष अशोकराव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी पालखी सोहळ्यात जवळपास ६० दिंड्या सहभागी झालेल्या असून पालखीचे प्रस्थान श्री क्षेत्र पिंपळनेर येथून १३ जून रोजी झाले. १५ दिवसांचा पायी प्रवास करून २७ जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल. Sant NilobaRay २८ जून रोजी सर्व संतांच्या पालख्यांचे दर्शन घेऊन २९ जून रोजी एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर परतीचा प्रवास ३० जून रोजी सुरू होऊन ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोपाळकाला करून पालखी सोहळ्याची सांगता होईल.
पंढरीहुनि गावी जातां । वाटे खंती पंढरीनाथा ।।
आता बोळवीत यावे । आमुच्या गावा आम्हासवे ।।
तुम्हां लागी प्राण फुटे । वियोग दु:खे पूर लोटे ।।
निळा म्हणे पंढरीनाथा । चला गावा आमुच्या आता ।।
 
Sant NilobaRay संत निळोबाराय यांनी पांडुरंगाबरोबर विविध संतांच्या आरत्या लिहिलेल्या आहेत. असं म्हणतात ते दररोज पांडुरंगाची आरती तयार करून सायंकाळी गात होते.
शब्दांकन : संदीप जिवलग कोहळे
अध्यक्ष , विश्व वारकरी सेवा संस्था , नागपूर