यवतमाळ,
वेदधारणी विद्यालय पिंपळगाव यवतमाळ येथे (Shahu Maharaj Jayanti) राजश्री शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर माहिती विषद केली. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, स्त्री-पुरुष विषमता अशा अनेक अमानुष रूढी, परंपरा मोडीत काढून समाजात समानता निर्माण करण्याचा प्रयत्न (Shahu Maharaj Jayanti) शाहू महाराजांनी केला. कोल्हापूर संस्थानांमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून शिक्षण सर्वांसाठी खुले करून दिले. विद्यालयाचे मुख्याध्यापक नीरज डफळे व सर्व शिक्षक वृंदांची कार्यक्रमास उपस्थिती होती.