संस्कृत अंताक्षरी स्पर्धेत रामगिरी गण विजयी

26 Jun 2023 19:38:52
नागपूर,
 
sanskrit antakshari कवी कालिदास दिनानिमित्त संस्कृत सखी सभा नागपूर द्वारे आयोजित कालिदास साहित्यावर आधारित, स्वर्गीय श्रीकांत देशपांडे स्मृती संस्कृत अंताक्षरी स्पर्धा १९ जून रोजी श्री हनुमान मंदिर देवस्थान, शंकर नगर येथे संपन्न झाली. प्रत्येकी आठ-आठ स्पर्धकांच्या रामगिरी गण व देवगिरी गण अशा दोन चमू सहभागी झाल्या. sanskrit antakshari स्पर्धेला संस्कृतानुरागी सख्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धा चार फेऱ्यांमध्ये संपन्न झाली. रामगिरी गण या स्पर्धेत विजयी ठरला.
 
 

sanskrit 
 
 
sanskrit antakshari या स्पर्धेमध्ये मयुरा देवरस व स्वाती सुळे यांना कौतुकपर विशेष पुरस्कार प्राप्त झाले. कल्याणी रोडे, कीर्ती मराठे, भारती पोलके, अनुश्री जोशी व प्रिया पेंढारकर यांना उत्कृष्ट आयोजन-नियोजन केल्याबद्दल विशेष पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. हंसश्री मराठे यांनी काम पाहिले. sanskrit antakshari संस्कृत सखी सभेच्या डॉ. विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया पेंढारकर यांनी अस्खलित संस्कृत भाषेत केले. तांत्रिक बाजू सोनाली अडावदकर यांनी सांभाळाली. sanskrit antakshari पुढील कार्यक्रमात अधिक चमू असतील असा प्रयत्न करावा, असे मत डॉ. लीना रस्तोगी यांनी व्यक्त केले.
 
 
डॉ. लीना रस्तोगी, डॉ. विणा गानू यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले. sanskrit antakshari आभार प्रदर्शन कीर्ती मराठे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. श्रद्धा तेलंग, डॉ. शारदा गाडगे, अरुणा करंदीकर, श्री हनुमान मंदिर देवस्थान शंकर नगर कार्यकारिणीचे सचिव दिलीप सगदेव, इतर कार्यकारणी सदस्य व शंकर नगर मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. भारती पोलके यांनी ऐक्य मंत्र म्हटला, त्यानंतर प्रसाद वितरण झाले. sanskrit antakshari
 
सौजन्य : महेश मोळकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0