देशातील पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्रात !

Artificial Intelligence AI विशेष "व्हर्च्युअल" तयारी

    दिनांक :27-Jun-2023
Total Views |
मुंबई, 
 
Artificial Intelligence AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे जग बदलेल असं म्हटलं जातं. त्यामुळे एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. Artificial Intelligence AI या पृष्ठभूमीवर देशातील पहिलं आर्टीफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ येत्या १ ऑगस्टपासून महाराष्ट्रात सुरू होणार आहे. मुंबईजवळील कर्जत येथे एआय तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाचं विद्यापीठ सुरू करण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. Artificial Intelligence AI
 
 
AI
 
Artificial Intelligence AI महाराष्ट्र सरकारच्या उच्च तांत्रिक आणि शिक्षण विभागाने या विद्यापीठाला मान्यता दिली आहे. राजधानी मुंबईजवळील कर्जत येथे स्थापन करण्यात आलेल्या युनिव्हर्सल आर्टिफिशियल इंटेलिजेंस विद्यापीठाचे ग्रीन कॅम्पस असणार आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना एआयविषयी शिक्षण घेण्याचे मार्ग या विद्यापीठामुळे खुले झाले आहेत. Artificial Intelligence AI या विद्यापीठात एआय आणि भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयांतील विशेष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि सुपर कॉम्प्युटरच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. Artificial Intelligence AI या मुंबई विद्यापीठात एआय तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हायटेक क्लास रूम्स, सुपर कॉम्प्युटर आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी उपकरणे अशी विशेष तयारीही करण्यात आली आहे.
 
 
एआय विद्यापीठामध्ये जागतिक घडामोडी आणि मुत्सद्देगिरी, कायदा, पर्यावरण आणि क्रीडा विज्ञान यासारखे इतर नवे-जुने संमिश्र अभ्यासक्रम तयार केले आहेत. Artificial Intelligence AI जग अधिक ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे वाटचाल करत असताना, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला स्पर्धेत कायम राहण्यासाठी एआय शिक्षण आणि संशोधन महत्त्वाचं आहे. Artificial Intelligence AI प्रत्येक विषय शिकवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून त्यात ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, मिक्स्ड रिअ‍ॅलिटी, आयओटी, ब्लॉकचेन यांवर शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी लॅब तयार करण्यात आली आहे.