नागपूर,
उपराजधानीत सर्वत्र कोट्यवधींचे अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होत असताना (GaneshPeth bus stand) गणेशपेठ एसटी स्टँडचे स्वरुप पूर्णत: दयणीय अवस्थेत आहे. बसस्थानकाच्या समोरील भागात नूतनीकरण आणि काही विस्तारीकरणाच्या कामासाठी 4 कोटी रुपये मंजूर झाले होते. प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली होती पण निधी न मिळाल्याने अर्ध्यावरच काम थांबविण्यात आले आहे. आगार प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार गत दोन वर्षांपासून निधी न मिळाल्याने नव्या इमारतीचे बांधकाम थांबले आहे.
इमारतीचे काम बंद
विशेषत: विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकाचा विकास करण्याचे अनेकवेळा नेत्यांनी आश्वासन दिले, मात्र अजूनपर्यंत हे आश्वासन पाळण्यात आले नाही. (GaneshPeth bus stand) कोरोनाच्या संक्रमण काळापासून इमारतीचे काम बंद असताना याकडे अद्याप कोणीही लक्ष दिले नाही. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी संप केला.त्यावेळी एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. राज्य शासनाकडून निधी मिळाल्यास उर्वरित बांधकाम वेगाने सुरु केल्या जाईल,असे एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनी दिली.
मुख्य इमारतीच्या उजव्या बाजूला विस्तारीकरणासाठी तयार करण्यात आलेली इमारत अपूर्ण अवस्थेत आहे. पिलर आणि छताचे कामही झाले असून उर्वरित काम थांबले आहे. जिथून (GaneshPeth bus stand) बसेस सुटतात त्या उजव्या बाजूला मोठे लोखंडी शेड तयार करण्यात आल्यानंतर छताचे पत्रके बसवणे बाकी आहे. गणेशपेठच्या मुख्य बसस्थानकातून बसेसच्या अनेक फेर्या होतात आणि हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मुख्य बसस्थानकात सध्याच्या शेडमध्ये प्रवाशांना बसायला आणि उभे राहायलाही जागा मिळत नाही. कोणताही पर्याय नसल्यामुळे पावसाळी दिवसातही बाहेर उभे राहावे लागते. प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन शेड तयार करण्याची गरज आहे.
बंगळुरूच्या धर्तीवर सर्वसुविधायुक्त बसस्थानक
गणेशपेठ (GaneshPeth bus stand) परिसरात विमानतळासारखे अत्याधुनिक आणि सुसज्ज बसपोर्ट तयार करण्याचे स्वप्न नागरिकांना दाखविण्यात आले होते, मात्र आजच्या स्थितीत एसटी बसस्थानकाची अवस्था गंभीर झाली आहे. बसस्थानकाच्या मागे असलेल्या डेपोच्या जागेचा उपयोग करुन बंगळुरूच्या धर्तीवर सर्वसुविधायुक्त बसस्थानक तयार केल्या जावू शकते. यासाठी बस आगार दुसर्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची गरज आहे. शहरात एकीकडे सिमेंट रोड, उड्डाणपूल, मेट्ो धावत असताना स्मार्ट सिटीतील बसस्थानकाचा कायापालट करण्याची तेवढीच आवश्यकता आहे.