Aditya Thackeray शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीला आज अपघात झाला. आदित्य त्याच्या कारने जात असताना एका बाइकस्वाराने धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी आदित्य ठाकरे कार चालवत होते. घटनास्थळी उपस्थित लोक आणि पोलिसांचे म्हणणे आहे की, दुसऱ्या गाडीच्या चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला.
सिग्नल तोडत असताना दुसऱ्या ड्रायव्हरने आदित्यच्या Aditya Thackeray कारला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी यामागील कारणांचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपस्थित लोकांचे जबाब नोंदवण्याचे आदेश दिले. आदित्यनेही या घटनेबाबत ट्विट केले आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. वेगात आलेल्या बाइकस्वाराने सिग्नल तोडल्याने हा अपघात झाला.