प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा

28 Jun 2023 16:10:04
अकोला,
Animal Protection जिल्ह्यात प्राण्यांची वाहतूक करताना प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी येथे दिले. बकरी ईदच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला. त्यानुसार बकरी ईद गुरुवार, 29 जून रोजी साजरी होणार आहे. तेव्हा अधिकार्‍यांनी प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलवबजावणी करावी. तसेच राज्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976, महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा 1995, गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. या सर्व कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
 
 
akoljay
 
जनावरांची वाहतूक करताना वाहतूक अधिनियमानुसार पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी जनावरांची स्वास्थ तपासणी केल्याचे व जनावर वाहतूक योग्य असल्याचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी. Animal Protection बकरी ईदच्या दिवशी जिल्ह्यात कुठेही जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल होणार नाही ,तसेच कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर पोलिस, महसूल, परिवहन व पशुसंवर्धन विभागाची पथके स्थापन करावे, असेही निर्देश देण्यात आले.
Powered By Sangraha 9.0