तभा वृत्तसेवा
उमरखेड,
संत, महंत, अवलिये, बैरागी, गोसावी, फकीर अशा विविध सांप्रदायिक संतांची पुण्यभूमी म्हणून (Gochar Swami) उमरखेडची प्राचीन ओळख आहे. देवीच्य्य साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या माता रेणुकेचे निर्वाणस्थान सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी आणि पैनगंगा, कयाधू व पूस असा पुण्य पावन नद्यांच्या विळ‘यात असलेले पूर्वीचे औदुंबर क्षेत्र आणि सांप्रतचे उमरखेड म्हणजे अध्यात्मिक अनुभूतीचे एक पवित्र स्थान म्हणून संपूर्ण महाराट्राला ज्ञात आहे.
संत सदानंद, विठ्ठल किंकर, बोपय्या, नागय्या, हरिदास कान्हा, चिन्मयानंद, गोचरस्वामी आदी सत्पुरुषांनी नाथ संप्रदायाचा पाया याच परिसरात घातला. संत आईनाथ महाराज, संत उत्तमश्लोक महाराज, संत साधू महाराज यांनी या स्थळी स्थिरावून भक्तांच्या ऐहिक जीवनाला दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. अवलिये, बैरागी, गोसावी आणि फकिरांनी येथील सामाजिक समरसता अधिक बळकट केली.
या (Gochar Swami) सर्व पाश्वर्र्भूमीवर आपल्या देदीप्यमान परंपरेचे जतन करीत चिन्मय-गोचर स्वामी या अद्वैत संन्यासी संतांचा एक मठ शहराच्या मध्यवस्तीत आजही उभा आहे. शेकडो हजारो नव्हे तर महाराष्ट्र, आंध‘, कर्नाटक या प्रांतांत विखुरलेल्या आपल्या लक्षावधी शिष्यगणांच्या जीवनात पारमार्थिक आनंद फुलवीत आहे. चिमण भट या पूर्वीच्या गृहस्थाश्रमी विरक्त पुरुषाने विठ्ठल किंकर यांच्याकडून संन्यास दीक्षा घेऊन आपल्या घरादाराला आध्यात्मिक केंद्र बनवून ईश्वरभक्तीत लीन केले.
त्यांचा निर्वाणानंतर त्यांचे अनुग‘हित शिष्य सहजानंद उर्फ गोचर स्वामी महाराजांनी या मठाच्या परंपरेचा विस्तार केला. काशी क्षेत्री मुक्कामी असताना त्यांच्या दैनंदिन पार्थीवलिंग पूजनावरून त्यांच्यात आणि काशीतील विद्वानांत प्रचंड वाद झाला. अशी पूजा संन्यासी धर्मात निषिद्ध असतानाही गोचरस्वामी ते करतात यावर विद्वतजनांनी आक्षेप घेऊन अशा पूजेपासून स्वामींना परावृत करण्याचा चंग बांधून त्यांच्या हातावरचे पार्थीव लिंग गंगार्पण केले.
असे बराच वेळ करूनही महाराजांच्या हातावर सारखे लिंग प्रगट होत गेले. शेवटी एक स्फटिक लिंग महाराजांच्या हातावर अचानक प्रगट झाले. विधिवत मंत्रोपचारात पूजन केल्यानंतर त्यातून बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन होते. त्याला श्रीविश्वंभर असे नाव असून आजही मठाच्या दैनंदिन परंपरेत या लिंगपूजनाला अतिशय महत्व आहे. पुढे महाराजांच्या आध्यात्मिक साधनेची अनुभूती येऊन तत्कालीन नेपाळ नरेशांनी (Gochar Swami) गोचरस्वामींचे शिष्यत्व स्वीकारले होते.
हिंगोली जिल्ह्यातील येहळेगाव येथील परंमहंस तुकाराम महाराज हे चिन्मयानंद महाराजांचे शिष्य असून ब‘ह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे संत तुकामाईचे शिष्य असा शिष्य संप्रदाय वाढवून आज संपूर्ण महाराष्ट्रभर गुरुभक्तीचा हा प्रसार आणि प्रचार अव्याहतपणे सुरू आहे. ‘सहज बोलणे हाचि उपदेश’ असा सरळ सोपा बीजमंत्र या संत मंडळींनी भक्तांना दिला आहे. सध्या या मठाचे दहावे मठाधीपती म्हणून माधवानंद गुरू वामनानंद महाराज हे विद्यमान असून बालपणापासून अखंड तुकामाईच्या सेवेत आयुष्य खर्ची घातलेल्या या साधक यतीचा अमृतमहोत्सवी सोहळा आणि चातुर्मास व अधिक मास 3 जुलै ते 29 सप्टेंबर 2023 या जवळपास 90 दिवसांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत होत आहे.
या (Gochar Swami) पारमार्थिक सोहळ्यात भक्तांच्या सोयीसुविधांसाठी संपूर्ण मठाचे विस्तारीकरण, सौंदर्यीकरण, प्रशस्त प्रसादालय, पारायण मंडप, ध्यानमंदिर अशा सर्व सुविधा कुलमुखत्यार अॅड. महेश कनकदंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी अल्पावधीत पूर्ण केले असून अतिशय भक्तीभावाने हा सोहळा संपन्न करण्याचा संकल्प उमरखेडकरांनी केला आहे.