राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सामाजिक न्याय दिन साजरा

OBC Mahasangh महामानवाच्या विचाराला उजाळा

    दिनांक :28-Jun-2023
Total Views |
नागपूर,
  
OBC Mahasangh राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे २६ जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते सुरेंद्र बुराडे हे होते. त्यांनी शाहू महाराजांनी आपल्या अल्पशा आयुष्यात संघर्ष करून फार मोठे निर्णय घेतल्याची माहिती दिली. संविधानातील कलम ३४०, ३४१, ३४२ ही देणगी शाहू महाराजांच्या दुरदृष्टीची साक्ष होय. OBC Mahasangh सक्तीचा शिक्षण कायदा, महिला अधिकाराचे कायदे, महार वतन रद्द करणे अश्या अनेक सुधारणा त्यांनी समाजासाठी केल्या, असेही बूराडे म्हणाले. OBC Mahasangh सदर कार्यक्रम दक्षिण नागपूर येथील राष्ट्रीय ओबीसी महासघांच्या कार्यालयात डॉ बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
 
 
OBC Mahasangh
 
अध्यक्षीय वक्तव्यात डॉ. बबन तायवाडे यांनी आजच्या ओबीसी समाजाने शाहू महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व समजून घेतले पाहिजे OBC Mahasangh तसेच दक्षिण नागपूर कार्यालयात महामानवाच्या विचाराला उजाळा देण्याचे कार्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्विकारले आहे, असे सांगितले. विचार पीठावर राष्ट्रीय सहसचिव शरद वानखेडे, महिला अध्यक्ष सुषमा भड, शकील पटेल हे उपस्थित होते. OBC Mahasangh
 
 
 
या कार्यक्रमाचे संचलन शहराध्यक्ष परमेश्वर राऊत यांनी केले. OBC Mahasangh कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुभाष घाटे, इसाक मन्सुरी, कल्पना मानकर, स्वाती जयस्वाल, आनंद माहुरे, वामनराव नील इत्यादींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार रमेश बुरले यांनी व्यक्त केले.
 
 
सौजन्य : परमेश्वर राऊत, संपर्क मित्र