गोवंश हत्या बंदी कायदा...कथा आणि व्यथा !

govansh hatya bandi kayda कत्तलीमुळे गोवंशाचा -हास

    दिनांक :28-Jun-2023
Total Views |
वेध
 
- नीलेश जोशी
govansh hatya bandi kayda ‘अन्न' ही मनुष्याची प्राथमिक गरज आहे, असे म्हटले जाते. पण सद्यस्थितीत विषमुक्त अन्नाची आवश्यकता आहे. शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे म्हणून अधिकाधिक रासायनिक खतांचा उपयोग करून गत काळात शेती उत्पादनात मोठी वाढ झाली. मात्र, पूर्वी मिळणारे सकस, विषमुक्त अन्न हे रासायनिक खतामुळे विषयुक्त झाले. जमिनीच्या सुपिकतेवरही रासायनिक खतांचा दुष्परिणाम झाला. govansh hatya bandi kayda माणसाचे आरोग्य आणि जमिनीची सुपिकता असे दुहेरी आव्हान समोर उभे ठाकले. आता या आव्हानाला सामोरे जाण्याकरिता पूर्वी होत असलेली गोवंश आधारित शेती हा एक सर्वोत्तम पर्याय असल्याबाबत सर्वांचेच एकमत आहे. शेती आणि शेतकèयाच्या संपन्नतेसाठी सर्वोत्तम पर्याय असलेल्या गोवंशाचे पोषण, संवर्धन व्हावे या हेतूने महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ मार्च २०१५ रोजी राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला. govansh hatya bandi kayda खरं म्हणजे त्यापूर्वी गोहत्या बंदी कायदा होता. त्या कायद्यातच सुधारणा करून महाराष्ट्रात संपूर्ण गोवंश हत्या बंदी लागू करण्यात आली.
 
 

Govansh 
 
 
गोवंश हत्या बंदीचा राज्य सरकारने कायदा केला. त्यापूर्वी या कायद्याविरोधात अनेक जण न्यायालयात गेले. पण गोवंशाची उपयोगिता न्यायालयाने स्वीकारली; त्यानंतरच या कायद्यावर शिक्कामोर्तब झाले. govansh hatya bandi kayda ‘पंचगव्य' हे मानवासाठी जणू अमृतच! पंचगव्य म्हणजे काय, तर गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांचे मिश्रण. प्राचीन काळापासून गोमूत्राचा उपयोग मानवाच्या विविध आजारांवर उपचार म्हणून केला जातो. त्वचारोग, पोटाचे आजार, हृदयविकार, किडनीचे आजार, क्षयरोग आदी अनेक आजारांवर उपचारासाठी गोमूत्र आणि शेणाचा उपयोग वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. काही संशोधकांनी तर विविध परिस्थितीत गोमूत्र डिस्टिलेट थेरपी म्हणून वापरली आहे आणि ते वेदनानाशक म्हणून उपयुक्त असल्याचे आढळले. govansh hatya bandi kayda गोमूत्रात पाणी ९५ टक्के, मूत्र खनिजे २.५ टक्के , मीठ हार्मोन्स एन्झायम्स २.५ टक्के, युरिया-प्रथिने चयापचय उत्पादन, मजबूत प्रतिजैविक एजंट, युरिक अ‍ॅसिड-प्रतिजैविक क्रिया कर्करोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, नायट्रोजन- लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ व मूत्रपिंड  उत्तेजित करते. सल्फर- रक्त शुद्ध व आतड्यासंबंधी पेरिस्टॉलिसिस वाढवते.
 
 
govansh hatya bandi kayda तांबे- चरबी जमा होण्यावर नियंत्रण ठेवते, लोह- रक्तातील आरबीसीचे उत्पादन वाढवते, सोडियम- रक्त शुद्ध व हायपर अ‍ॅसिडिटी नियंत्रित करते. पोटॅशियम- क्षुधावर्धक व स्नायूंचा थकवा दूर करते तर अन्य क्षार- बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ व केटोआसिड्रस प्रतिबंधित करते. अकोला जिल्ह्यात असलेल्या आदर्श गोसेवा एवम् अनुसंधान प्रकल्प येथे विविध ३६ प्रकारांच्या औषधींची निर्मिती पंचगव्यापासून केली जाते. गाईचे शेण हे खरं म्हणजे गाईच्या खालेल्या अन्नपदार्थांचे न पचलेले अवशेष आहे; ज्यामध्ये विष्ठा आणि लघवी, लिग्निन, सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज ही प्रमुख रचना आहे. govansh hatya bandi kayda गायीच्या शेणाचा वापर जैवखत म्हणून केला जातो. जैविक शेतीच्या संवर्धनासाठी आणि आरोग्यदायी अन्नधान्य निर्मितीसाठी गायीचे शेण अत्यंत उपयुक्त आहे. म्हणूनच शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा केला. शासनाने केलेला कायदा हा मनुष्यहिताचा असला, तरी दुर्दैवाने तो सहज स्वीकारला गेला असे चित्र नाही. आजही अनेक जण केवळ तात्कालिक आर्थिक लाभासाठी गाईची कत्तल करतात. govansh hatya bandi kayda त्यामुळे शेती, शेतकरी आणि मनुष्य हितासाठी उपयुक्त असलेल्या देशी गोवंशाच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत.
 
 
कत्तलीमुळे गोवंशाचा रोज -हास होतो आहे. कायद्यामुळे त्यावर अंकुश लागला अशी परिस्थिती नाही. काही प्रमाणात यांत्रिक कत्तलखान्यात होणारी कत्तल कमी झाली असण्याचा अंदाज आहे. पण गावोगावी, विशिष्ट वस्त्यांमध्ये रोजच अवैध कत्तल होते. गोवंश हत्या बंदी कायद्याच्या निर्मितीनंतर त्याची अंमलबजावणी करण्याचे काम मुख्यतः पोलिस प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाकडे आहे. govansh hatya bandi kayda मात्र, या दोन्ही विभागांतील अधिकारी, कर्मचारी या कायद्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात, हे अधिक महत्त्वाचे आहे. काही जण गाईला ‘आई' मानतात तर काही जण ‘खाद्य' मानतात. एवढा सीमित हा विषय नक्कीच नाही. मानवाच्या कल्याणासाठी, सकस निरोगी अन्नासाठी गोवंश जगावा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दुर्दैवाने ईदेला कुर्बानी देताना मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल होते, हे कटू सत्य आहे. govansh hatya bandi kayda पोलिस प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने मानवासाठी गोवंशाची उपयोगिता याचे समुपदेशन समाजात सतत केले तरच समाजातील सर्व घटक कायदा स्वीकारतील, हे निश्चित !
 
९४२२८६२४८४