मेहकर,
स्थानिक महेश विद्या मंदिरा मध्ये (Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी वारकर्यांची वेशभूषा करून महेश विद्यामंदिर ते स्व.धर्मवीर दिलीपराव रहाटे चौकापर्यंत दिंडी काढली यावेळी ज्ञानोबा माऊली -तुकारामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नृत्य,रिंगण, फुगडी इत्यादीची सादरीकरण करून महाराष्ट्राच्या संत परंपरांचे दर्शन यावेळी घडविले.
या Ashadhi Ekadashiकार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ .सुभाष लोहिया ,प्राचार्य ज्योती मंत्री ,उपप्राचार्य के .एम. गायकवाड उपस्थित होते .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक अश्विन हाडे सुनाट मॅडम , सावजी , दुर्गा वडूळकर , पुनम शर्मा, महेश शिंगणे , धरम टाक , मनीष इंगळे,निकम, तिजारे तथा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.