अकोला जिल्ह्यात यंदा केवळ 26.9 मिमी पाऊस

29 Jun 2023 17:15:36
अकोला,
Akola district गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाने जी बरसात केली होती , त्याच्या विपरीत वर्तन यंदा झाले असून यंदाच्या खरीत हंगामात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे.ज्या कालावधीत जून महिन्यात साधारणत: 125 मि.मी.पावसाची गरज असते त्या कालावधीत यंदा जून महिन्यात केवळ 26.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.याचा फटका शेतकर्‍यांना बसू नये म्हणून कृषी तज्ज्ञांनी शेतकर्‍यांना सल् ला दिला असून पुरेशा ओली शिवाय त्यांनी पेरणी करू नये असे सांगितले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंंत जिल्ह्यात 9,611 हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. यंदा सुरवातीचे पावसाचे नक्षत्र रिक् त गेल्यावर आर्द्रा नक्षत्राला लागताच जिल्ह्यात पाऊस झाला पण तो रिमझिम स्वरूपाचाच होता.28 पर्यंत जोरदार पाऊस पडणार असा हवामान खात्याने अंदाज दिला होता. आता त्याची प्रतीक्षा केली जात आहे.
 
 
dfrty67
 
यादरम्यान काही शेतकर्‍यांनी मान्सून येणार या आशेने आहे त्याच स्थितीत कपाशीची लागवड सुरू केली. सध्या जिल्ह्यात 9 हजार 611 हेक्टरवर शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी केली असून, त्यात कपाशीची लागवड सर्वात जास्त झाली आहे.आता शेतकरी अत्यंत आर्ततेने पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. यादरम्यान येथील डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकर्‍यांना आवाहन केले आहे की, जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय, तसेच 80 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय त्यांनी खरिपाची पेरणी करू नये.शिवाय आता चांगला पाऊस झाला तर पेरणीसाठी दुप्पट बियाणे वापरावे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत 9,611 हेक्टरवर पेरणी करण्यात आली Akola district असून यात सर्वात जास्त 9,469 हेक्टरमध्ये कपाशी, 135 हेक्टरमध्ये सोयाबीन व 7 हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झालेली आहे. त्यातही सार्वाधिक पेरणी तेल्हारा व बार्शीटाकळी तालुक्यात झाली आहे.अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. गेल्या वर्षी जून मध्ये याचा कालावधीत जिल्ह्यात सरासरी 114.4 मिमी म्हणजेच 89.5 टक् के पाऊस झाला होता. त्या मानाने यंदा याच कालावधीत जून मध्ये आतापर्यंत केवळ 26.9 मिमी.म्हणजेच फक्त 21.0 टक्के पाऊस झाला आहे.28 जून रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात 1.5 मिमी पाऊस झाल्याचा अहवाल आहे. गतवर्षी याच कालावधीत जून मध्ये आकोट 57.7, तेल्हारा 99.2, बाळापूर 164.1, पातूर 90.3, अकोला, 150.2, बार्शिटाकळी,109.5, मूर्तिजापूर 104.2 मि.मी. असा पाऊस झाला होता.
Powered By Sangraha 9.0