ग्रामविकास अधिकार्‍यावर कारवाई करा : नागरिकांची मागणी

30 Jun 2023 20:24:23
बुलढाणा, 
Village Development Officer : ग्राम पंचायत सावळा सुंदरखेड हनवतखेड ता.बुलढाणा येथील विद्यमान ग्राम पंचायत सदस्यांना गट ग्रामपंचायतचा शासकीय कामकाज करण्याकरिता प्रशासनामार्फत ग्राम विकास अधिकारी यांची नियुक्ती केली असून कार्यरत ग्रामविकास अधिकारी सदस्यांना विचारात न घेता मनमानीपणे कारभार करीत असल्याने गट ग्रामपंचायत सावळा-सुंदरखेड मधील सामान्य जनता त्रस्त झाली असून पाणी, रस्ते, वीज, नाल्या साफ करणे याकडे दूर्लक्ष करुन जाणीवपूर्वक सरपंच पती दुर्लक्ष करीत असून ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच निलेश राठोड व सदस्यांनी जिल्हा परिषदेचे उममुकाअ आशिष पवार यांच्याकडे केली आहे.
 
Village Development Officer
 
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य हे ग्रामविकास अधिकारी यांना वेळोवेळी नवनिर्वाचीत सदस्य निवडून आल्यानंतर त्यांनी कामकाजात पारदर्शकता यावी या उद्देशाने व कुठल्याही प्रकारचा गैरकारभार होवू नये, याउद्देशाने प्रोसेडिंग बुक लॉक करणेबाबत ठराव घेवून तसे करण्यास सांगितले असतांना त्याबाबत प्रोसेंडिंग बुकाची नक्कल देण्यात यावी अथवा ग्रामपंचायत सदस्यांच्या अवलोकनार्थ, माहितीसाठी सदर प्रोसेडिंग बुकाचे वाचन करणेबाबत कळविले असता तसे न करता, सदस्यांना अपमानीत करुन त्यांचे हक्क व अधिकारावर बाधा आणून ग्राम पंचायतीच्या विकास कामास अडथळा निर्माण करीत असल्याने त्यांचेवर कायदेशिर कारवाई करणे न्याय व जरुरी आहे. या निवेदनावर ग्राप सदस्या सारीका दाभाडे, कमलेश चंदन, स्वाती तळेकर, शिवाजी हिवाळे, पुनम राजपूत, स्वाती गुलगुले विलास खरे, कमल गवई, कांचन सोनपसारे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.  (Village Development Officer) 
 
 
Powered By Sangraha 9.0