व्हीआयपीएस समूहाच्या कार्यालयांवर ईडीचे छापे

    दिनांक :04-Jun-2023
Total Views |
पुणे, 
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे आणि नगर परिसरात मोठी कारवाई केली आहे. (VIPS group) व्हीआयपीएस ग्रुप-ग्लोबल फिलिएट बिझनेस या खाजगी वित्तीय संस्थेच्या कार्यालयांवर शनिवारी हे छापे टाकण्यात आले. या कारवाईत 18 कोटी 54 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
 
VIPS group
 
व्हीआयपीएस (VIPS group) ग्रुप-ग्लोबल फिलिएट बिझनेस या वित्तीय संस्थेने गुंतवणूकदारांकडून 125 कोटी रुपये घेतले आहे. ही रक्कम हवाला व्यवहारामार्फत वळविली असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. (VIPS group) व्हीआयपीएस ग्रुप आणि ग्लोबल फिलिएट वित्तीय संस्थेचा प्रमुख विनोद खुटे सध्या दुबईत आहे. आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने खुटे याने गुंतवणूकदारांकडून 125 कोटी रुपये घेतले. ही रक्कम त्याने हवाला व्यवहारामार्फत वळविल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. खुटे याने गुंतवणूकदारांना त्याच्या योजनांची माहिती देण्यासाठी अ‍ॅपचा वापर केला असल्याची माहिती आहे.