मंगरुळनाथ,
Hindu Empire Day अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा यावर्षी ३५० वा राज्याभिषेक दिवस म्हणजेच हिंदू साम्राज्य दिवस देशभर साजरा होत आहे त्याचेच औचित्य साधून विश्व हिंदू परिषद बजरंग दल मंगरूळनाथ तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा मंगलधाम येथील अर्धाकृती पुतळ्याला सकाळी ९ वाजता दुग्धाभिषेक करून हिंदु साम्राज्य दिवस उत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा मंत्री सतीश हिवरकर यावेळी बोलतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे पाचशे वर्षाच्या अनुत्तरीत राहिलेल्या समस्येचे निदान होय. शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळे हिंदू समाज, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती टिकून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या कीर्तीचा कधीही मोह नव्हता, अफजलखानाच्या आक्रमणाच्या वेळी त्याने हिंदूंवर अनेक अत्याचार केले पण शिवाजी महाराजांनी अपकीर्तीची परवा न करता योग्य वेळेची वाट पाहून विजय संपादन केला.

शिवरायांनी निर्माण केलेल्या या नवचैतन्यामुळे शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर राजाराम महाराज दक्षिणेत अडकून पडलेले असताना राज्याला ना खजिना ना सेना ना सेनापती अशा अवस्थेत Hindu Empire Day मुघलांशी तब्बल वीस वर्षे झुंज मराठ्यांनी दिली शेवटी औरंगजेबाला याच भूमीत स्वतःला कबरीत गाडून घ्यावे लागले छत्रपती शिवाजी महाराज आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणेच स्वतः रणांगणावर सर्वांसमोर असायचे असा हा रयतेचा राजा आजही आम्हाला प्राणप्रिय आहे असे हिवरकर यांनी सांगितले. याप्रसंगी विहिंप व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.