नवी दिल्ली,
IRCTC Package : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी IRCTC द्वारे विविध प्रकारचे टूर पॅकेज चालवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून IRCTC शिवभक्तांना 7 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची संधी देत आहे. या पॅकेजद्वारे तुम्हाला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, सोमनाथ ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश मंदिर आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज.ला भेट देण्याची संधी मिळेल.

IRCTC ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. हा संपूर्ण प्रवास 9 रात्री 10 दिवसांचा असेल. या संपूर्ण पॅकेजसाठी प्रति व्यक्ती भाडे रु. 18,466 पासून सुरू होते. तुम्ही या पॅकेजचे भाडे मासिक हप्त्यांमध्ये देखील भरू शकता. हे ट्रेन टूर पॅकेज उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून सुरू होईल. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. गोरखपूरसह, पर्यटक बस्ती, मानकापूर, अयोध्या कॅंट, बाराबंकी, लखनौ, कानपूर, ओराई, वीरांगना लक्ष्मीबाई आणि ललितपूर स्थानकांवरून या ट्रेनमध्ये चढू/डिबोर्ड करू शकतील. 22 जून 2023 पासून ही यात्रा सुरु होणार आहे. या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करता येईल. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल. (IRCTC Package)