नवी दिल्ली,
आयआरसीटीसीने (Ramayana darshan) खास दिल्लीतील लोकांसाठी हा टूर प्लॅन तयार केला आहे. IRCTC ने या श्रीलंकेच्या सहलीला 'रामायण यात्रा' असे नाव दिले आहे. ही यात्रा 5 दिवस आणि 4 रात्रीची असेल. पहिल्या दिवशी, या टूर पॅकेज अंतर्गत, दिल्ली विमानतळावरून कोलंबोला रवाना होईल आणि यानंतर नुवारा एलिया येथे ही यात्रा जाईल.
या टूर पॅकेज अंतर्गत, दुसऱ्या दिवशी (Ramayana darshan) सीता अम्मान मंदिर, दिवूरामपोला, हकागला गार्डन आणि गायत्री पीडामला भेट देऊ शकता. येथे भेट देण्यासाठी इतरही अनेक सुंदर ठिकाणे आहेत. तिसर्या दिवशी, हनुमान मंदिर आणि अनेक धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, तुम्ही इतर पर्यटन स्थळांना भेट देऊ शकाल. चौथ्या दिवशी कोलंबोसाठी प्रस्थान. कोलंबोमधील पिन्नावाला एलिफंट अनाथाश्रम आणि इतर ठिकाणी भेट देऊ शकता.
सर्व ठिकाणांना भेट दिल्यानंतर तुम्हाला कोलंबो विमानतळावर आणले जाईल. येथे तुम्हाला दिल्ली विमानाने पाठवले जाईल. या टूर पॅकेजअंतर्गत 58,500 रुपये भाडे भरावे लागणार आहे. या (Ramayana darshan) टूर पॅकेज अंतर्गत राहण्याची, जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था केली जाणार आहे.