खोकला आणि तापाची 'ही' औषधे बॅन...तुम्हा कोणती वापरता?
दिनांक :04-Jun-2023
Total Views |
नवी दिल्ली,
drugs for cough and fever सरकारने एफडीसीच्या 14 औषधांवर बंदी घातली आहे. यामध्ये खोकला आणि तापाच्या औषधांचाही समावेश आहे. ही औषधे घेतल्याने जीवाला धोका असल्याचे सरकारने अधिसूचनेत म्हटले आहे. म्हणूनच त्यांना वैद्यकीय महत्त्व नाही. बंदी घातलेल्या औषधांमध्ये निमसुलाइड आणि विरघळणाऱ्या पॅरासिटामॉल गोळ्या आणि क्लोफेनिरामाइन मॅलेट आणि कोडीन सिरप सारख्या औषधांचा समावेश आहे. 'फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन' (FDC) असलेल्या या औषधांवर बंदी घालण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी अधिसूचना जारी केली होती. अधिसूचनेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की FDC मधील 14 औषधांचा वैद्यकीय उपयोग नाही. या औषधांमुळे लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. तज्ज्ञ समितीने सरकारला केलेल्या शिफारशींमध्ये म्हटले आहे की, "या FDC (फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन) औषधांसाठी कोणतेही उपचारात्मक औचित्य नाही आणि या औषधांच्या सेवनाने मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, जनहितार्थ, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियम, 1940 च्या कलम 26A अंतर्गत या FDC चे उत्पादन, विक्री किंवा वितरणावर बंदी घालणे आवश्यक आहे. drugs for cough and fever विशेष म्हणजे, FDC औषधे ही अशी औषधे आहेत जी दोन किंवा अधिक सक्रिय औषधी घटक एका निश्चित प्रमाणात मिसळून तयार केली जातात. 2016 मध्ये, सरकारने 344 औषधांच्या कॉम्बिनेशनच्या निर्मिती, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने शास्त्रोक्त आकडेवारीशिवाय संबंधित औषधे रुग्णांना विकली जात असल्याचे सांगितल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. या आदेशाला कारखानदारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. सध्या बंदी घातलेल्या 14 FDC 344 संबंधित औषधांच्या संयोजनाचा भाग आहेत.