लालपरीचा अमृतकाळ !

Maharashtra ST वयोवृद्धांना मोफत प्रवास सुविधा

    दिनांक :05-Jun-2023
Total Views |
वेध 
नितीन शिरसाट
Maharashtra ST महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने ७५ व्या वर्षांत म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. एसटीच्या ताफ्यात आता वेगवेगळ्या रंगरूपाच्या बसेस आहेत. पण पहिली लाल रंगाची एसटी बस आजही राज्यातील नागरिकांच्या आठवणीत कायम आहे. या बसमुळेच एसटीच्या गाड्यांना ‘लालपरी' म्हणायला सुरुवात झाली. Maharashtra ST एसटीने महाराष्ट्राच्या कानाकोप-याला जोडले. यामुळे प्रवास करणे सोपे झाले. सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारा हमखास प्रवास या बसने सहज सोपा केला. ‘बहुजन हिताय'चा नारा देत ‘गाव तेथे एसटी बस व थांबा' असा हा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी बसस्थानकात प्रवासी निवारा, पाणपोई, दररोज स्वच्छता यासह अनेक सुविधा अपूर्ण आहेत. Maharashtra ST त्या पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाने महामंडळाला निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
 
 

st 
 
 
एसटीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. या बससोबत प्रवास सुरू झाला आणि महाराष्ट्र सरकारने १९४८ मध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करून खेड्यापाड्यात स्वस्त व सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. Maharashtra ST ३० लाकडी गाड्यांच्या माध्यमातून प्रवासी सेवा देण्यास सुरुवात करणा-या महामंडळाकडे सध्या १९ हजार १७८ हजार गाड्या आहेत. यातील सरासरी १६ हजार ५०० गाड्या दररोज महामार्गावर येत असून या गाड्यांच्या माध्यमातून राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवासी सेवा पुरविली जाते. शहरातील तसेच खेड्यापाड्यातील नागरिक सुरक्षित प्रवासासाठी आजही एसटी महामंडळाला प्राधान्य देतात. Maharashtra ST त्यामुळेच एसटीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सहा वर्षांपासून दरवर्षी एसटीच्या प्रवासी संख्येने अडीचशे कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र, सुरक्षित समजल्या जाणा-या एसटी गाड्यांच्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
 
 
Maharashtra ST मागच्या वर्षी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करून शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एसटीच्या कर्मचा-यांना वेतन, भत्ते, वैद्यकीय सुविधा आदी द्यावे तसेच थकित वेतन द्यावे यासाठी एसटी कर्मचा-यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी संप पुकारला. हा संप अनेक दिवस सुरू होता. एसटी महामंडळात साध्या गाड्यांची संख्या अपुरी आहे. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी हजारो विद्युत बसगाड्यांचा ताफ्यात समावेश करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. Maharashtra ST मात्र, तातडीने बसगाड्या उपलब्ध होण्यासाठी डिझेलवर धावणाèया दोन हजार बस चेसिस घेण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक बी-६ प्रकारातील इंजिन असलेली ११ मीटर लांबीची ही बस आहे. चेसिस खरेदी करून त्यावरील ढाच्याची महामंडळाच्या कार्यशाळेत बांधणी करण्यात येणार आहे. दोन हजार बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या बस खरेदीसाठी ७०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी राज्य सरकारकडून देण्यात येईल. Maharashtra ST बसगाड्या ग्रामीण भागातून शहरांना जोडण्यासाठी लांब पल्ल्याच्या मार्गांवर चालविण्याचे नियोजन आहे. साध्या बसची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
 
आता अनेक वर्षांपासूनची एसटीला भेडसावणारी समस्या म्हणजे खाजगी वाहतूकदारांनी राजरोसपणे सुरू केलेली वाहतूक. पूर्वी याला चोरटी वाहतूक म्हटले जायचे. Maharashtra ST अशा वाहतूकदारांना आरटीओ दंड लावायचं; आता मात्र ही अगदी अधिकृतच राजरोसपणे थाटात सुरू असते. या खाजगी वाहतूकदारांना फक्त वाहतूक पोलिसांना भरपूर फायदा घशात घालायचा असतो. त्यामुळे मुंबई-पुणे, नागपूर-पुणे अशा मलाई मार्गांवर वाहतुकीपासून त्यांनी सुरुवात केली. आता तर छोट्या गावापर्यंत हे लोण पोहोचलेले आहे. एकीकडे एसटीला नियमांच्या आधीन राहून वाहतूक करावी लागते तर या खाजगी वाहतूकदारांना कसलेच नियम नाहीत. राज्यभर एसटीच्या १६ हजार बसेस चालतात. Maharashtra ST जवळपास ६५ लाख प्रवासी रोज एसटीतून प्रवास करतात. त्यातून मिळणा-या उत्पन्नामधून एसटी कर्मचा-यांचे पगार आणि इतर खर्च केला जातो. एसटी महामंडळामार्फत समाजातील अनेक लोकांना विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अंध-अपंग, महिलांना ५० टक्के सवलत वयाची अट न ठेवता देण्याचा निर्णय घेतल्याने महिलांची संख्या प्रवास करण्यात वाढली आहे.
 
 
तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मोफत प्रवास सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय अनेक जण बोगस बनावट प्रमाणपत्र देऊन चोरट्या मार्गाने प्रवास करून एसटीला आर्थिक नुकसान करीत आहे. Maharashtra ST तोट्यात आलेल्या या महामंडळाचे खाजगीकरणाच्या दृष्टीने शासनाची वाटचाल दिसून येत आहे. कामगार संघटना तसेच महामंडळावर आपली उपजीविका असणारे कर्मचारी त्याला विरोध करीत आहेत. त्यासाठी शासनाने काही सवलती बंद करून चांगल्या दर्जाच्या नवीन बसेस, बसस्थानकाचे आधुनिकीकरण, प्रवासी सुविधा पुरविली तरच भविष्यात एसटीचा अमृतकाळ टिकून राहील.
९८८१७१७८२८