डिजीटल वॉल पेंटींगऐवजी हॅन्ड पेंटिंगला प्राधान्य द्यावे

पेंटर संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

    दिनांक :06-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, 
डिजीटल वॉल पेंटिंग (Painters Association) ऐवजी हॅन्ड वॉल पेंटिंगला प्राधान्य देण्यात यावे, या मागणीचे निवेदन सोमवार, 5 जून रोजी महाराष्ट्र राज्य पेंटर संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तहसिलदार यांचे मार्फत देण्यात आले. अनेक वर्षांपासून राज्यामध्ये पेंटर लोक वॉल पेंटींगचे काम करत असून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह याच पेंटींगच्या व्यवसायावर अवलंबुन आहे. राज्य शासनाने नुकतेच डिजीटल वॉल पेंटींगसाठी राज्य स्तरावर निविदा प्रक्रीया चालविली असून त्यामुळे हॅन्ड पेंटिंग करणार्‍या लाखो (Painters Association) पेंटरवर उपासमारीची वेळ आली आहे.
 
Painters Association
 
डिजीटल वॉल पेंटींगच्या (Painters Association) कामांमध्ये अत्यंत जाचक अटी टाकण्यात आल्याने सहाजिकच धनदांडग्या आणि मोठ्या व्यावसायिकांना ही कामे मिळतील. त्यामुळे पारंपारिक व्यवसाय करणारे गोरगरीब पेंटर कलाकारांना त्यांचे हक्क असतानाही तो मिळत नसल्याने ते बेरोजगार होत आहेत. त्यांच्यापुढे कूटूंबाचा उदरनिर्वाह करण्याचा, जगण्या मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई यांनी शासनाच्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी निविदा प्रक्रीयाच्या फॉर्म किंमत रुपये 20 हजार विनापरतावा, सुरक्षा अनामत रक्कम 5 लाख रुपये, निविदा दाखल करण्यासाठी 15 कोटींची वार्षिक उलाढाल अशा जाचक अटी लादल्या आहेत.
 
 
ज्याची राज्यातील एकही (Painters Association) पेंटर पुर्तता करू शकत नाही. त्यामुळे विभागीय किंवा जिल्हा स्तरावर निधी देवुन वॉल पेंटींगची कामे स्थानिक पेंटर मार्फत करावी, डिजीटल वॉल पेंटींगला परवानगी न देता हॅन्ड वॉल पेंटींगचे काम पारंपारिक पेंटर्सची दरबारी नोंद करून त्यांनाच देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यानंतरही शासनाने अन्याय केल्यास लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन, बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना संघटनेेचे अध्यक्ष प्रफुल ढोकणे, उपाध्यक्ष बाळु धनस्कर, देवराव आडे, निलेश मेश्राम, स्वप्नील आत्राम, संजय मंगळे, मनोज अर्जुने, चरण मारबदे, विशाल राऊत, प्रमोद बाडे, चेतन जिभकाटे, गौरव राऊत, मोहित भगत, ऋषिकेश ठाकरे, आकाश गावंडे, नितेश विघ्ने, उमेश दातार, अनिल देवतळे व तालुक्यातील पेंटर उपस्थित होते.