पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार

    दिनांक :06-Jun-2023
Total Views |
- शंभुराज देसाई यांची माहिती
 
मुंबई, 
राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि मंत्री Shambhuraj Desai शंभुराज देसाई यांनी मंगळवारी दिली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपात जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झाले नाही, अशी माहिती देसाई यांनी दिली. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 मध्ये शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी आठ जागांवर विजय मिळवला होता.
 
 
Shambhuraj Desai
 
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशन किंवा त्याआधीच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहकारी म्हणून मला वाटते.आमचे राज्यातील नेते सूत्रावर विचार करतील आणि भाजपा-शिवसेनेची मध्यवर्ती समिती त्याला मान्यता देईल. लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे किंवा ज्या जागांवर शिवसेना लढली आहे, त्या आमच्यासाठी सोडण्यात याव्या, अशी आमची मागणी आहे, असे देसाई यांनी सांगितले.