ॲपलचे सीईओ टिम कुक यांचा मोठा खुलासा

ChatGPT चा वापर, ही चिंतेची बाब

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
कॅलिफोर्निया,
Apple CEO Tim Cook : ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉक्स चॅटजीपीटीवर आपले मत व्यक्त केले आहे. एकीकडे त्याने AI बद्दलचा उत्साह व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे त्याने संबंधित चिंता देखील शेअर केल्या आहेत. गुड मॉर्निंग अमेरिकाशी बोलताना टीम कूक म्हणाले की, तो OpenAI चॅटबॉट ChatGPT बद्दल खूप उत्साहित आहे, पण त्याच वेळी तो त्याचा अवलंब करण्याबाबत खूप सावध आहे. एकीकडे, जिथे इतर टेक कंपन्यांचे सीईओ हे तंत्रज्ञान सहजपणे स्वीकारत आहेत, तर दुसरीकडे, टीम कुक त्याबाबत अधिक सावध भूमिका घेत आहेत.

Apple CEO Tim Cook
 
वॉल स्ट्रीट जनरलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार Apple ने OpenAI चॅटबॉट ChatGPT चा वापर मर्यादित केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, गोपनीयतेच्या चिंतेमुळे (Apple CEO Tim Cook) ॲपलने चॅटजीपीटी वापरण्याची परवानगी अत्यंत मर्यादित कर्मचाऱ्यांना दिली आहे.
 

चॅटजीपीटीने चॅटबॉट्सच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त
ChatGPT चॅटबॉटबद्दल प्रश्न विचारला असता, (Apple CEO Tim Cook) टिम कुकने कबूल केले की, त्यांची कंपनी AI वापरत आहे. त्यांनी या नवीन तंत्रज्ञानाबद्दल उत्साह व्यक्त केला आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये एक अद्वितीय क्षमता आहे. अशा परिस्थितीत कंपनी आगामी काळात त्याचा वापर करेल. तथापि, त्यांनी एआय विचार, चुकीची माहिती आणि नियमन यासारख्या गोष्टींच्या महत्त्वावरही जोर दिला आहे. या क्षेत्राचे नियमन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या नवीन तंत्रज्ञानामुळे कंपन्यांच्या विकासाला गती मिळेल, पण त्यासोबतच आणखी अनेक आव्हानेही उभी राहणार आहेत. अशा परिस्थितीत योग्य नैतिक पाऊल उचलणे ही कंपन्यांची जबाबदारी आहे.
 
 
कंपन्यांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज
मायक्रोसॉफ्ट, गुगल सारख्या इतर टेक कंपन्यांच्या विपरीत, (Apple CEO Tim Cook) ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी एआयच्या वापराचे समर्थन केले आहे, तसेच अधिक सावध आणि दूरदृष्टीवर भर दिला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या उत्साहाने AI वापरत आहेत, तर Apple हे तंत्रज्ञान हळूहळू आणि संयमित पद्धतीने वापरण्याचा सल्ला देत आहे. टीम कूकच्या विधानावरून असे दिसून येते की, ते वैयक्तिक पातळीवर हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी खूप उत्सुक आहेत, तर ऍपलसाठी ते संयमित पद्धतीने वापरतील.