नोएडा,
उत्तरप्रदेशच्या उन्नावमधील मोरवा येथे (love jihad) राहणारी एक मुलगी नोएडामधील एका कंपनीत काम करीत होती. चार वर्षांपूर्वी तिला संभल जिल्ह्यातील एका तरुणाने आपली ओळख बदलून प्रेमात फसवले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून फोटो व व्हिडीओ रेकॉर्डिंग केला. तिला ब्लॅकमेल करीत तिच्याकडून हळूहळू सहा लाख रुपये लंपास केले. तरुणीने त्याला लग्नाचे विचारल्यावर त्याने तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. तो तरुणीला जीव मारण्याची धमकी देऊ लागला.
धर्मांतराबद्दल ऐकून मुलीला आश्चर्य वाटले. झालेली फसवणूक लक्षात येताच तिने (love jihad) मुलाबद्दल संभल येथे जाऊन चौकशी केली. तेव्हा तिच्या समजले की, या तरुणाचे नाव अनुराग नसून जैद अली आहे. तो संभलच्या चंदौसी तालुक्यामधील बनियाठेर पोलिस स्टेशन हद्दीमधील नरौली गावाचा रहिवासी आहे. तरुणीने नरौली पोलिस चौकीत जाऊन या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी तेथे वरिष्ठ पोलिस अधिकारी आले होते. हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांनी लवजिहाद या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई होत नसल्याचे पाहून ते पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या गोंधळाची माहिती अप्पर पोलिस अधिकारी श्रीचंद्र यांना मिळताच ते चौकीत पोहोचले, त्यांनी कारवाईचे आश्वासन देऊन गोंधळ शांत केला.
रात्री उशिरा या मुलीच्या (love jihad) तक्रारीवरून बनियाठेर पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध लवजिहादचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विरुद्ध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.