फिरायला गेलेल्या दाम्पत्याला कारची धडक, पतीचा अंत

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
दौंड, 
पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या (Car Accident) पती-पत्नीला भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुर्गेश जगताप या युवकाचा मृत्यू झाला. पाटस दौंड अष्टविनायक या रस्त्यावर पहाटे ही घटना घडली. दुर्गेश जगताप व त्यांची पत्नी स्वाती हे दोघे पहाटे दौंड रस्त्यावर दौंड बाजूने पाटस दिशेला मॉर्निंग वॉक करीत होते.
 
Car Accident
 
दौंडकडून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने दुर्गेश जगताप यांना जोराची धडक दिली. या (Car Accident) अपघातात दुर्गेश हे रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात जगताप यांच्या पत्नी स्वाती थोडक्यात बचावल्या आहेत.