आधार-पॅन जोडणीची मुदत पंधराव्यांदा वाढली

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
नवी दल्ली, 
आधार आणि पॅन (Aadhaar-PAN link) कार्डच्या जोडणीची मुदत पुन्हा वाढवून 30 जून करण्यात आली आहे. आधार-पॅन जोडणीची मुदत मागील पाच वर्षांत पंधराव्यांदा वाढवण्यात आली आहे. मात्र, यावेळी ही मुदत वाढवून दिली जाण्याची शक्यता नाही. ज्या लोकांना 1 जुलै 2017 पूर्वी पॅन कार्ड जारी करण्यात आले, त्यांना पॅन आणि आधारची जोडणी करणे अनिवार्य आहे.
 
Aadhaar-PAN link
 
दरवर्षी निवेदन जारी करून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (Aadhaar-PAN link) आधार-पॅनची जोडणी करण्याचे आवाहन करते. मात्र, जोडणीची मुदत नेहमीच वाढवली जात आहे. आधार-पॅनची जोडणी न केल्यास मुदतीनंतर पॅन कार्ड निष्कि‘य होईल. ते सुरू करण्यासाठी मोठा दंड भरावा लागेल.