तभा वृत्तसेवा
दिग्रस,
Akshay Bhalerao Murder Case : नांदेड बोनढार येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याबाबत वंचित बहुजन आघाडी, दिग‘स तालुका, बौद्ध समाज बांधव यांनी तहसील कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुधाकर जाधव यांच्यामार्फत मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.

शेकडो समाज बांधवांच्या सह्या असलेल्या या निवेदनात, पुरोगामी महाराष्ट्रात मानवतेला काळीमा फासणार्या घटनेत व अनुसूचित जातीवरील अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. याचीच प्रचिती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, हा राग मनात धरून अक्षय भालेराव या भीमसैनिकाची मराठा समाजाच्या नीच गावगुंडांनी निर्घृण हत्या केली, असल्याचे म्हटले आहे. अशा नराधमांना फाशीच देणे, पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये तत्काळ आर्थिक मदत देणे, कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देणे, कुटुंब व घटनेचे साक्षीदार यांना संरक्षण देणे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पीडित कुटुंंबाचे पुनर्वसन करणे, आरोपींची मालमत्ता जप्त करणे, अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, गावातील अल्पसं‘याक बौद्ध समाजाला आत्मसंरक्षणाकरिता शस्त्र परवाने द्यावेत, आरोपींना पाठीशी घालणार्यांना सहआरोपी करणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
(Akshay Bhalerao Murder Case)