अल्कोहोल कंपनी डियाजिओचे CEO इव्हान मिनेझिस यांचे निधन

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
लंडन,
जगातील सर्वात मोठी (Diageo CEO Ivan Menezes) अल्कोहोल कंपनी डियाजिओचे भारतीय वंशाचे सीईओ इव्हान मॅन्युएल मिनेझिस यांचे बुधवारी निधन झाले. लंडनच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 64 वर्षांचे होते आणि या महिन्याच्या अखेरीस (जून) निवृत्त होणार होते. माहितीनुसार, पोटात अल्सर झाल्याने त्यांना लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Diageo CEO Ivan Menezes
 
इव्हान मिनेझिस (Diageo CEO Ivan Menezes) यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील मॅन्युएल मिनेझिस हे भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते. मिनेझिस यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज आणि आयआयएम अहमदाबाद येथे शिक्षण घेतले. त्यांचा भाऊ व्हिक्टर मिनेझिस हे सिटी बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीईओ आहेत. मिनेझिस (Diageo CEO Ivan Menezes) 1997 मध्ये डियाजिओमध्ये रुजू झाले. 2012 मध्ये ते कंपनीचे कार्यकारी संचालक बनले आणि त्यानंतर 2013 मध्ये त्यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात कंपनीची कामगिरी खूप चांगली होती आणि Diageo ही जगातील सर्वात मोठी स्पिरीट्स कंपनी बनली.
 
 
सध्या, कंपनीचे जगभरात 200 हून अधिक ब्रँड आहेत आणि कंपनीचा व्यवसाय 180 बाजारपेठांमध्ये पसरलेला आहे. जॉनी वॉकर व्हिस्की हा कंपनीचा सर्वात लोकप्रिय ब्रँड आहे. स्कॉच व्हिस्की, व्होडका, जिन, रम, कॅनेडियन व्हिस्की, लिकर्स आणि टकीला यांमध्ये Diageo हा अग्रगण्य ब्रँड आहे. मिनेझिस (Diageo CEO Ivan Menezes) यांच्या प्रकृतीची स्थिती पाहता डिएजिओने सोमवारी हंगामी सीईओच्या नावाची घोषणा केली. मेनेझिस यांच्यावर वैद्यकीय उपचार होईपर्यंत डेब्रा क्रू कंपनीचे अंतरिम सीईओ राहतील. मिनेझिस यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर दोन दिवसांनी बुधवारी त्यांच्या मृत्यूची बातमी आली.