दक्षिण नागपूरातील अमरनगर रोडची दुर्दशा (बघा व्हिडीओ)

AmarNagar Nagpur माजी नगरसेवकांचे दुर्लक्ष

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
नागपूर,
 
AmarNagar Nagpur दक्षिण नागपूर प्रभाग ३४ येथील चिखलीरोड, अमरनगरकडे जाणाऱ्या रोडची अत्यंत दुर्दशा झाली आहे. तेथील दोन महिन्यापासून मोठ्या पाईपलाईनचे काम सुरू होऊन ते संपन्न झाले. AmarNagar Nagpur खोदकाम केलेले पाईपलाईन झाकल्यानंतर माती ओसांड पडलेली आहे. एका बाजूने ट्राफिक जाणं व येणं करते आहे. त्यामध्ये खूप लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. AmarNagar Nagpur याकडे मनपाने लक्ष देऊन नागरिकांच्या सोयीसाठी दुरुस्तीकरिता पाऊल उचलावे.
 

amar nagar 
 
गेल्या दोन महिन्यापासून काम झाले असून अशीच माती रस्त्यावर पडली आहे. या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. पंधरा दिवसांपूर्वी पाऊस पडला त्यावेळी खूपच चिखल झाला होता. AmarNagar Nagpur मान्सून तोंडावर येऊन पडलाय तरीही रस्त्याच काम ठप्पच आहे. कधी करणार हे काम? किती दिवस सहन करणार नागरिक? हा प्रश्न निर्माण झाला आहे. AmarNagar Nagpur रस्त्यावरील जाणाऱ्या- येणाऱ्यांच्या गाड्या घसरत आहेत. आजही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रोजचा त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
 
 
 
AmarNagar Nagpur याकरिता या भागातील माजी नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि त्यांच्यापर्यंत गेलो तर काय करणार हे सगळं प्रशासन करीत असल्याचे सांगण्यात येते. मग कुणाकडे दाद मागायची हेच कळत नाही ? AmarNagar Nagpur म्हणून या रस्त्यावरील महाकाली नगर, सरस्वती नगर, अमरनगर, न्यु अमर नगर, अध्यापक नगर, शिवशक्ती नगरातील नागरिकांनी मान्सून येण्याच्या आधीच रोड दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र