पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा दोन हजारावर नागरिकांना मिळाला लाभ

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
भंडारा, 
Animal Husbandry Department : लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने पाऊल उचलत शासन आपल्या दारी अभियानातून पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ 2200 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना मिळाला आहे.
 
Animal Husbandry Department
 
पशुसंवर्धन विभागाकडून विविध योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना थेट लाभ देण्यात येतो. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदानावर एकात्मिक विकास कुक्कुट कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय पिल्लांचे गट वाटप या योजनेंतर्गत 125 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या लाभार्थ्यांना एक दिवसीय पिल्ले व खाद्य वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच वैरण विकास कार्यक्रमांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गात 1136 लाभार्थ्यांची निवड झालेली असून लाभार्थ्यांना चारा पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले. विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या 172 लाभार्थ्यांना 2 दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्यात येत आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत 2 दुधाळ जनावरांचे गट व शेळी गट वाटप 57 लाभार्थ्यांची निवड झाली असल्याचे पशूसंवर्धन अधिकाèयांनी सांगितले. (Animal Husbandry Department) 
 
 
याशिवाय मानव विकास कार्यक्रमांतर्गत 120 महिला बचत गटांची निवड झालेली असून 1100 महिलांना शेळी गटाचा लाभ देण्यात आला. राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजना व मराठवाडा योजना या अंतर्गत 150 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात प्राप्त झाला. शासन आपल्यादारी अभियानांतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात 47 शिबिरे घेण्यात आली असून 2 हजार 200 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुबोध नंदागवळी व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. योसुदेव वंजारी यांनी योग्य नियोजन करून पशुसंवर्धन विभागामार्फत शिबिरांचे आयोजन केल. या माध्यमातून केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ दिला असल्याने लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. (Animal Husbandry Department)