अनुराग ठाकूरांचे पैलवानांना चर्चेसाठी आमंत्रण

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
नवी दिल्ली,
Anurag Thakur केंद्र सरकार पुन्हा एकदा कुस्तीपटूंशी चर्चा करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी रात्री उशिरा एका ट्विटमध्ये सांगितले की, सरकारला कुस्तीपटूंशी त्यांच्या प्रश्नांवर बोलायचे आहे, त्यामुळे त्यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याआधी शनिवारीही कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीच्या पुढील भागात सरकारने पैलवानांना चर्चेसाठी आमंत्रित केल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी आज चरखी दादरी येथील विनेश आणि संगीता फोगट यांच्या गावात पंचायत बोलवण्यात आली आहे. मात्र, पंचायत होण्यापूर्वीच सरकारने पैलवानांना चर्चेसाठी बोलावले आहे.
 
ANURAG
 
दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचीही दोनदा चौकशी केली आहे. पोलीस आज किंवा उद्या दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याची शक्यता आहे, Anurag Thakur या अहवालात पोलीस आपला तपास आतापर्यंत कुठे पोहोचला हे सांगतील.