IDBI मध्ये मोठी पदभरती

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
Recruitment in IDBI : IDBI बँकेने नुकतीच पदभरतीची अधिसूचना जारी केली आहे. भरती अधिसूचनेनुसार, IDBI ने 2023-2024 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती घेतली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. IDBI बँकेने 2023-2024 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन २० जूनपर्यंत अर्ज करू शकतात.

Recruitment in IDBI
 
136 स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. यात प्रामुख्याने व्यवस्थापकाची 84 पदे, सहाय्यक महाव्यवस्थापक 46 पदे तर उपमहाव्यवस्थापक 6 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹ 1000 आहे. तर, अनुसूचित जाती/जमातीसाठी अर्जाची फी ₹200 आहे. सर्वप्रथम idbibank.in या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर स्पेशलिस्ट ऑफिसरची भर्ती – 2023-24 (फेज II) अंतर्गत अर्ज लिंकवर क्लिक करा. आता स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा. त्यानंतर फॉर्म भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा. शेवटी ते डाउनलोड करा आणि भविष्यातील गरजेसाठी प्रिंटआउट घ्या. (Recruitment in IDBI)