आपच्या नेत्या अतिशींच्या दौर्‍याला केंद्राची मंजुरी

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
नवी दिल्ली,
दिल्लीच्या शिक्षण मंत्री अतिशी (AAP leader Atishi) यांच्या पुढील आठवड्यातील ब्रिटन दौर्‍याला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात दिली. याबाबतचा प्रस्ताव आर्थिक व्यवहार विभागाकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यावरील प्रक्रियेनंतर याचिकाकर्त्या व्हिसासाठी अर्ज दाखल करू शकतील, असे केंद्राच्या वतीने युक्तिवाद करणार्‍या वकिलाने न्यायालयात सांगितले.
 
AAP leader Atishi
 
अतिशी (AAP leader Atishi) यांच्या विदेश दौर्‍याला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने बुधवारी सकाळी मंजुरी दिली, असे त्यांच्या वतीने युक्तिवाद करणार्‍या वकिलाने सांगितले. मात्र, ही मंजुरी मंगळवारी दिल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. ही मंजुरी सहा जून रोजी देण्यात आली. राजकीय मंजुरीही दिली आहे. त्यामुळे कोणताही निर्देश देण्याची गरज नाही, असे केंद्र सरकारच्या वकिलाने सांगितले.