पुणे,
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून (Indrayani River) इंद्रायणी नदीत रसायनयुक्त सोडणार्यांवर अधूनमधून कारवाई केली जाते. काही महिन्यांपूर्वी मनपाने सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. परंतु, उद्योजकांकडून नदीत रसायनयुक्त पाणी सोडणे बंद होत नाही. असंख्य वारकरी या नदीत आंघोळ करतात. आता आषाढी वारीला सुरुवात होत आहे. वारी चार दिवसांवर आली असताना नदीत रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले. यामुळे वारकर्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
इंद्रायणी नदी (Indrayani River पुन्हा एकदा केमिकलच्या पाण्यामुळे फेसाळली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी चार दिवसांवर आली असताना वारीतील वारकर्यांचा आरोग्य धोक्यात आणण्याचा हा प्रकार सुरू आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 11 जूनला होत आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर, देश आणि जगभरातील विठ्ठलभक्तांसाठी वारीचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. या सोहळ्यात सहभागी होणार्या वारकर्यांच्या आरोग्याची कुणाला काही पर्वा नाही, अशी स्थिती आळंदीतल्या (Indrayani River इंद्रायणी नदीकडे पाहून होत आहे. यामुळे वारीत सहभागी होणार्या वारकर्यांचे आरोग्य इंद्रायणी नदीत स्नान केल्याने धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.