तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Worked Stopped : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात गेल्या मे 2023 या महिन्यात पाच दिवस शिक्षणाधिकार्याचे पदच एकप्रकारे रिक्त राहण्याची अजब घटना घडली. सुमारे महिनाभरानंतर उघडकीस आलेल्या व चर्चेचा विषय झालेल्या या घटनाक‘मात ‘झारीतील शुक‘ाचार्या’ची भूमिका वठविणार्या पंकज मार्कंड या वरिष्ठ लिपिकाला रितसर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

झाले असे की, येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत या 6 ते 16 मे 2023 या कालावधीत विदेश दौर्यावर होत्या. अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अशी प्रतिमा असलेल्या डॉ. राऊत यांनी नियमांनुसार त्यांचे सहकारी उपशिक्षणाधिकारी डॉ. शिवानंद गुंडे यांना शिक्षणाधिकार्याचा 11 दिवसांचा प्रभार सोपविण्याचा रितसर प्रस्ताव तयार केला. नियमित कार्यपद्धतीनुसार हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मु‘य कार्यकारी अधिकार्यांची मंजुरी धेऊन कार्यरत करावा लागतो. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक पंकज मार्कंड याने तो सादर केला. मु‘य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनीही शिक्षणाधिकारी पदाचे महत्व लक्षात घेऊन या प्रस्तावाला त्वरित मान्यता दिली. (Worked Stopped)
उपशिक्षणाधिकारी डॉ. शिवानंद गुंडे यांना अकरा दिवस शिक्षणाधिकारी प्रभार देण्याचा हा परिपूर्ण कार्यालयीन प्रस्ताव वरिष्ठ लिपिक मार्कंड यालाही रितसर सोपवण्यात आला. तो त्याने डॉ. गुंडे यांना सुपूर्द करायला हवा होता. पण मार्कंड याने तो खिशातच ठेवून दिला. परिणामी, कोणतेही कारण नसताना 6 मे 2023 पासून यवतमाळ जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद ‘रिक्त’ होऊन गेले. 6 मे पासून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रशासकीय कामानिमित्त संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या सोळाही तालुक्यांमधून शे-दीडशे किलोमिटर अंतरावरून येणार्यांना ‘शिक्षणाधिकारी गैरहजर आहेत’, असेच उत्तर मिळू लागले. काहीजण तर हे पद ‘रिक्त’ असल्याचेही उपरोधाने बोलू लागले. 6 ते 9 मे पर्यंत असेच सुरू राहिले, बोंबाबोंब होत राहिली. (Worked Stopped)
अखेर 10 मे रोजी वरिष्ठ लिपिक पंकज मार्कंड याने आपल्या खिशातील प्रस्ताव काढून उपशिक्षणाधिकारी डॉ. शिवानंद गुंडे यांना सोपविला. 10 मे 2023 या पाचव्या दिवशी डॉ. गुंडे यांनी शिक्षणाधिकारी म्हणून प्रभार स्वीकारला आणि जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी हे चार दिवसांपासून ‘रिक्त असलेले पद’ कार्यरत झाले. शिक्षणाधिकार्याचा प्रभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम डॉ. गुंडे यांनी वलि पंकज मार्कंड याला ‘कर्तव्यात कसूर’ या कारणाखाली कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रभार संदर्भात मार्कंड याने केलेल्या बेजबाबदारपणाची कारणे या नोटीसीत सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहेत. (Worked Stopped)
10 मे 2023 रोजी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 अंतर्गत बजावलेल्या या नोटीसमध्ये 12 तासांच्या आत खुलासा करण्याचे, अन्यथा नियमांनुसार कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शिक्षण आयुक्त, जिल्हाधिकारी, जिप मु‘य कार्यकारी अधिकारी व शिक्षण उपसंचालक यांनाही या नोटीसीच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे 16 तालुक्यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचे कामकाज 6 ते 10 मे या कालावधीत ठप्प पडल्याचेही या नोटीसीत स्पष्टपणे नमूद आहे. या नोटीसीवर वरिष्ठ लिपिक पंकज मार्कंड याच्याकडून कोणती ‘कार्यवाही’ केल्या गेली आणि कोणती ‘कारवाई’ केल्या गेली याची मात्र माहिती मिळू शकली नाही. आपल्या कार्यालयाकडून केल्या जाणार्या शिस्तबद्ध ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांना कोणीही ‘निरर्थक’ करून टाकू नये या उद्देशाने हा प्रभार न देण्याचा घाट घातल्या गेला असावा आणि तो अंगलट आला असावा, अशी जिल्हाभरातील शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे.
(Worked Stopped)