मोथा गावात साथरोग, प्रशासन सज्ज

07 Jun 2023 21:16:20
तभा वृत्तसेवा 
चिखलदरा, 
Administration Ready : शहराच्या लागून असलेल्या मोथा गावामध्ये दुषीत पाण्यामुळे साथरोगाची लागण झाल्याची घटना मंगळवारी सांयकाळी समोर आल्यानंतर प्रशासन सज्ज झाले असून आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाली आहे.
 
Administration Ready
 
चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात बुधवारी 60 ते 70 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दहा ते बारा जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. उर्वरीत उपचार घेऊन घरी परतले आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात गावात अजूनही रुग्ण निघत आहेत. आरोग्य विभागाची चमू मोथा येथे दाखल झाली असून गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. गावात टँकरद्वारे येणारे पाणी क्लोरीन टाकून वितरीत करण्यात आले आहे. आवश्यक त्या सर्व उपायोजना प्रशासन करीत आहे. चिखलदरा परिसरातील आलाडोह, लवादा, शहापूर, अमझरी इत्यादी गावातूनही अतिसाराचे रुग्ण येत आहे. मोथा या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. एक दिवस पाणीपुरवठा करणार्‍या टँकर चालकाने दुसर्‍या ठिकाणावरून पाणी आणले व ते पाणी दूषित असल्यामुळे गावात साथरोगाची लागण झाली, अशी माहिती गजानन शनवारे यांनी दिली. (Administration Ready) 
 
 
परिस्थिती नियंत्रणात : सचिव
गावातल्या सर्व घरांमध्ये जीवन ड्रॉपच्या बॉटलचे वाटप करण्यात आले आहे. गावात येणार्‍या टँकरचे क्लोरीनेशन करून गावात पाणी वाटप करण्यात येत आहे. सहा तारखेपासूनचे टँकरचे पाण्याचे नमुने घेतले व ते सगळे नमुने शुद्ध आले व गावात टँकर वाढवण्याची मागणी आम्ही गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे. सध्या दहा-बारा रुग्ण गावात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी प्रतिक्रिया मोथा ग्रामपंचायतच्या सचिव रागिनी भोरे यांनी तभाला दिली. (Administration Ready) 
 
Powered By Sangraha 9.0