जाजपूर,
Odisha Accident : बालासोर येथे झालेल्या अपघातातून ओडिशातील नागरिक अद्याप सावरलेले नसताना बुधवारी जाजपूर येथे मालगाडीखाली चिरडून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चार कामगार जखमी झाले आहेत. जाजपूर रोड स्थानकाच्या जवळ सात कामगार रेल्वेरूळ दुरुस्तीचे काम करीत होते. त्याच वेळी तिथे वादळी पाऊस सुरू झाल्याने कामगारांनी येथे उभ्या असलेल्या मालगाडीचा आश्रय घेतला. त्यावेळी मालगाडीला इंजिन लागलेले नव्हते. कामगार पाऊस थांबायची प्रतीक्षा करीत असताना, (Odisha Accident) वेगाने वाहणार्या वार्यामुळे ही मालगाडी पुढे सरकू लागली.
मालगाडीच्या खालून बाहेर पडण्यात तीन कामगार यशस्वी ठरले तर, चार कामगार मालगाडीच्या चाकाखाली आहे. या चारपैकी तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. (Odisha Accident) मालगाडीच्या खालून बाहेर पडण्यात यशस्वी झालेले कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कटक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.