लंडन,
ICC World Test Championship : ट्रेव्हिस हेडचे नाबाद शतक आणि स्टीव्ह स्मिथचे नाबाद अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात शेवटचे वृत्त आले तेव्हा 70 षटकांत 3 बाद 265 धावा उभारल्या होत्या, तेव्हा स्मिथ 72 धावांवर, तर हेड 107 धावांवर खळत होते.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने ढगाळ वातावरणात व योग्य प्रमाणात गवत असलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे अपेक्षित होते. भारताने मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव व शार्दुल ठाकूरसह चार वेगवान गोलंदाजांना अंतिम एकादशमध्ये स्थान दिले, परंतु फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला विश्रांती देण्याचा कठीण निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा निर्णय योग्य ठरवित मोहम्मद सिराजने आपल्या सलामीच्या स्पेलमध्ये, उस्मान ‘वाजाच्या रुपाने, तर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला प्रारंभीच दोन जबरदस्त हादरे दिले. त्यामुळे अंतिम (ICC World Test Championship) कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 73 धावा अशी झाली होती.
ओव्हल मैदानावर पहिल्या तासात आव्हानात्मक परिस्थितीत उस्मान ‘वाजा 10 चेंडू खेळूनही भोपळा न फोडताच तंबूत परतला, तर डेव्हिड वॉर्नरने 60 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 43 धावा काढल्या. सिराजने उस्मानला, तर ठाकूरने वॉर्नरला यष्टिमागे के. एस. भरतच्या हातात झेल सोपविण्यास भाग पाडले. सिराज व शमी या दोघांनीही ऑस्ट्रेलियाला पहिल्या तासात रोखून धरले.
वॉर्नरला आगामी अॅशेस मालिकेसाठी अंतिम एकादशमध्ये आपले स्थान निश्चित करायचे आहे, त्यामुळे त्याने धैर्याने लढा दिला. 15 व्या षटकात वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या चेंडूवर वॉर्नरने चार चौकार ठोकलेत. वॉर्नर व मार्नस लॅबुशेनने दुसर्या ड्यासाठी 69 धावांची भागीदारी केली. ICC World Test Championship शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर वॉर्नरचा उडालेला झेल केएस भरतने झेप घेत उत्तमरीत्या पकडला आणि आपली निवड सार्थ ठरविली. संघाच्या धावसं‘येत पाच धावांची भर पडत नाही तोच मोहम्मद शमीने मार्नल लॅबुशेनला यष्टिमागे केएस भरतकडे झेल देण्यास भाग पाडले. लॅबुशेने 62 चेंडूंचा सामना करीत 3 चौकारांसह 26 धावांची भर टाकली. लॅबुशेन बाद झाला, तेव्हा ऑस्ट्रेलियाची 24.1 षटकांत 3 बाद 76 धावा अशी स्थिती होती.
पुढे स्टीव्ह स्मिथ व ट्रेव्हिस हेडने ऑस्ट्रेलियाची पडझड थांबविली व भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत चहापानापर्यंत आपल्या संघाला 51 षटकांत 3 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला, त्यावेळी स्मिथ 33 धावांवर,, तर हेड 60 धावांवर खेळत होता. स्मिथ व हेड ही जोडी खेळपट्टीवर चांगलीच जमली होती. ICC World Test Championship स्मिथने 144 चेंडूंत आपल्या 50 धावा पूर्ण केल्या, तर ट्रेव्हिस हेडने 106 चेंडूंत 14 चौकार व एका षट्काराच्या मदतीने आपल्या 100 धावा पूर्ण केल्या.