महागाईमुळे बिघडवणार स्वयंपाकाचे बजेट

- भाज्यांचे दर दुपटीने वाढले

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
भुसावळ,
सध्या पगार वाढत नाही, पण (Cooking budget) महागाई झपाट्याने वाढते अशी स्थिती आहे. अगदी स्वयंपाक घरातील किराण्यापासून ते अत्यावश्यक सेवांपर्यंत सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. आता त्यात भाज्यांचे दरही दुपटीने वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. बहुतांश भाजीपाला किलोमागे किमान 20 रुपयांनी महाग झाला आहे. दुसरीकडे कांदे, बटाट्याचे दर उतरल्याने प्रत्येक भाजीत त्याचा पुरेपूर वापर करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. टोमॅटोचे दर दोन दिवसांमध्ये दुपटीपेक्षा जास्त, बारीक हिरवी मिरची 30 रुपये किलोने महाग झाली आहे.
 
Cooking budget
 
आठवड्यापूर्वी खरिपाच्या तयारीसाठी शेतकर्‍यांनी (Cooking budget) भाजीपाला लागवड थांबवली आहे. त्यात उष्णतेचा तडाखा, मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळाने तडाखा दिल्याने उत्पादनावर परिणाम होऊन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली. परिणामी, हिरव्या पालेभाज्यांचे दर 60 ते 80 रुपये किलोवर पोहोचले आहेत.
 
 
सध्या बाजारात बर्‍यापैकी आवक आहे, पण पहिला दमदार पाऊस झाल्यानंतर आवक कमी होऊन (Cooking budget) भाजीपाल्याचे दर वाढतील. साधारण ऑगस्ट महिन्यात पुन्हा आवक वाढल्यानंतर हे दर कमी होतील. आताही भाव जास्त असल्याने भाजीपाला विक्रीवर परिणाम झाला आहे. अगदी कोथिंबीरही महागल्याने अनेक ग्राहकांना मोजकी खरेदी करावी लागते आहे.