महाराष्ट्र पेटणार?...video कोल्हापुरात हिंसाचार; 19 जूनपर्यंत संचारबंदी
दिनांक :07-Jun-2023
Total Views |
कोल्हापूर,
Kolhapur Curfew शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस लावल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. पोस्टविरोधात आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या मांडला. तर त्याचवेळी आंदोलकांकडून दगडफेक आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. दरम्यान पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट किंवा स्टेटस व्हायरल होऊन कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. परिणामी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी 19 जूनच्या मध्यरात्री 12 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येणे, सभा, मिरवणूक, सभा घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.
कोल्हापुरमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर गृहखात्याने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे. तसेच याबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. दरम्यान कोणावरही अन्याय होता काम नये याकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. Kolhapur Curfew दरम्यान जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश असतानाही आदोलकांकडून विरोध सुरु आहे. कोल्हापुरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की होत असल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात जमावाने आंदोलन केले असून यावेळी पोलिसांनी लाठीमार केला आहे. त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान जनतेने शांतता पाळावी असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.