तभा वृत्तसेवा
नांदगाव पेठ,
Nitesh Rane : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाजनसंपर्क अभियान अंतर्गत नांदगाव पेठ एमआयडीसी मधील टेक्सटाईल्स पार्कमध्ये शुक्रवार 9 जून रोजी दुपारी 4 वाजता विकासतीर्थ या औद्योगिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह भाजपचे दिग्गज नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. त्यात खासदार अनिल बोंडे, आमदार संजय केळकर, माजी पालकमंत्री तथा आ.प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड यांच्यासह इतरांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अविरत 9 वर्ष देशाची सेवा करून सेवा, सुशासन आणि गरीबांचे हित साधले आहे. औद्योगिक क्षेत्रात क्रांती करत नांदगाव पेठ येथे शेतकर्यांच्या कापसाला भाव मिळावा म्हणून महाराष्ट्रातील एकमात्र पीएम मित्रा टेक्सस्टाईल पार्क दिला आहे. 9 वर्षांच्या सेवाकाळात केलेली विकासात्मक कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाच्या वतीने विकासतीर्थ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.