नवी दिल्ली,
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले नागपूरचे खासदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज सदिच्छा भेट घेतली.
यावेळी, नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पत्नी कांचन गडकरी, मुलगा सारंग आणि सून मधुरा गडकरी यांचीही उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नातू निनाद आणि अर्जुन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक रोप भेटीदाखल दिले.
या सदिच्छा भेटीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांच्यात सहकुटुंब अनौपचारिक आणि मनमोकळी चर्चा झाली.